Skip to main content

कथा

व्यवहार...

लेखक किश्या यांनी गुरुवार, 30/01/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य माथ्यावर आला होता. अजय आणि त्यांच्या शेतावर काम करणारा गडी गणपत लिंबाच्या झाडाखाली भाकरी ची परडी उघडी करुन बसले होते. गणपतने परडीवरच गाळान काढताच मस्त लसनाच्या ढेस्याचा मस्त वास वातावरनात घुमला. अजय आणि त्याने भाकरीवर मस्त ताव मारुन आडवे पडण्याच्या बेतात होते. "तुम्ही साळत जाता न्हव ? कितवीला हाईसा मालक? " गणपत, "मी पाचवीला आहे का रे?" अजय. "काई न्हाई असच विचारलं, मला बी साळत जायच होतं पण ४ थीत नापास झाल्यामुळे मला बा नं परत धाडलच न्हाई साळतं." गणपत..... हे सगळे होईपर्यंत अजय च्या डोळ्यावर झोप आली होती..

क्ष-गफ ला पत्र... २

लेखक वडापाव यांनी बुधवार, 22/01/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष-गफ ला पत्र _____________________________/\_____________________________________ मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं. तशी हाताची घडी सुटली. 'एक मिनीट' 'काय झालं?' 'तू हे लेटर वाचलंस ना?' मी 'हो' म्हटल्यावर तिने ते हातात उचलून घेतलं, आणि माझ्याकडे रोखून बघायला लागली. 'त्यातल्या कंटेंट बद्दल, म्हणजे मेसेजबद्दल आपण नंतर बोलूया.. आधी माझे काही डाऊट्स क्लिअर कर.' मी आवंढा गिळला.. 'क-क-कोणते डाऊट्स?' 'शिसानविवि म्हणजे काय?' मी निश्वास सोडला.

इच्छापूर्ती..! (कथा)

लेखक psajid यांनी बुधवार, 22/01/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
छे ! वैताग आला आज हातात बाईक नव्हती तर ! कॉलेजला जातोय तेंव्हापासून विनाबाईक हा पहिलाच प्रवास. तुम्ही म्हणाल - मग घरी बसावं. पण नाही, अण्णांनी उभारलेला ज्ञानवृक्ष आणि त्यांच्यातील मायाळू - मनमिळाऊ प्राध्यापकांशी हितगुज नाही झालं तर चुकल्या - चुकल्यासारखं होतं. माणसांच्या वाळवंटात भरकटलेल्या कोकरागत मन कासावीस होतं. म्हणूनच हातात बाईक नसतानाही कॉलेजला आलो होतो. खूप दिवसांनी आज बस चा प्रवास अनुभवला होता. आता घरी जाताना रिक्षाने जावे म्हणून रिक्षा स्टेन्डकडे चाललो होतो. मारुती चौकातून दोनच मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टेन्ड होते. चौकात येउन सहज डावीकडे नजर गेली.

हो सकता है..

लेखक mohite jeevan यांनी सोमवार, 20/01/2014 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशरावानी आता पर्यंत अनेक लोक पाहिले आहेत व पण स्वत: आदर्श व्यक्ती होण्याचा कल आसला तरी माणसाच्या स्वभावाचा आभ्यास करण्यास त्याना खुप रस आसे.म्हणुनतर समोर माणुस कसला ही आसला तरी ते त्याच्याशी चांगले बोलत,तसे त्याला अनेक प्रश्न करुन त्याचे निरक्षण करी,व त्या निरक्षणा वरुनच मग त्याच्या मनात एखादी व्यक्ती आशी आहे तशी आहे ठरवत. खुप ठीकाणी त्यानी नोकरी केली पण आज ज्या नोकरीवर आहेत ते आँफीस काम आसले तरी एक समस्या होती.

शिव: मूर्तीशास्त्र

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 19/01/2014 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

क्ष-गफ ला पत्र

लेखक वडापाव यांनी रविवार, 19/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला.

मनसुखसेट्ची चाय ! - २

लेखक पहाटवारा यांनी शनिवार, 18/01/2014 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनसुखसेट्ची चाय ! ... मनसुखसेठ्च्या अजब युक्तीवादावर प्रत्युत्तर न सापडून देशपांड्यांनी ऊगाचच गल्ल्याशी चाळा सुरु केला अन गावी गेल्यावर काय बोलायचे याची मनोमन तयारी सुरु केली. ***************************************** "रात्रीच्या जेवणापर्यंत परत यायला जमेल ना?" दुपारच्या जेवणाचा डबा ऊघडत सौ.देशपांड्यांनी विचारले.

मनसुखसेट्ची चाय !

लेखक पहाटवारा यांनी शुक्रवार, 17/01/2014 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
"ए देस्सपांडेसेठ, चाय प्यायलीस काय तू ?" दुकानातल्या अगणीत तसबीरींच्यापैकी एखाद्या तसबीरिसमोर ऊभ्या-ऊभ्या चालू असलेल्या आपल्या पूजेत व्यतय न आणता, देशपांड्यांनी मनसुखसेट्च्या हाकेकडे रोज-प्रमाणेच दुर्लक्ष केले. "पांडूसेठला आज अद्रक सस्ता भेटलेला दिसतोय यार्डात!" मनसुखसेठची टिप्पणी चालूच होती. जुन्या कसब्यात दुर्गादेवीच्या देवळापासल्या गर्दीतल्या दुकानांच्या रांगेत मनसुखसेट अन देस्सपांडेसेटची दुकाने एकमेकाला खेटून होती. देस्सपांडेसेट - असा कुठल्याहि 'श' चा 'स्स', असा 'स' वर जोर देऊन ऊच्चार करणे हि मनसुखसेठ्ची खास स्टाईल !

क्षितिजावरले तरंग

लेखक मीराताई यांनी शनिवार, 11/01/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
या खिडकीशी मी असा एकटाच बसलेला असतो.खिडकीचा कट्टा चांगला रूंद आहे. त्यामुळे अंगाचं मुटकुळं करून मला तिथे छान बसता येतं. ही खोली तशी घरातल्या एका बाजूला आणि खिडकी तर आणखीनच एका कोपऱ्यात. त्यामुळे घरात वावरणाऱ्यांना मी दिसत नाही नी मला ते! करायचंय काय म्हणा दिसून तरी! मी बोलतो ते त्यांना पटत नाही अन् ते बोलतात ते मला पटत नाही. घरातले काय न् बाहेरचे काय, माझं बोलणं पटेल असं भोवताली कोणीच दिसत नाही मला. मग बोलायचं तरी कुणाशी? कधीतरी वाटतं एकटा आहे मी, अगदी एकटा! या संपूर्ण जगात माझं असं कुणीच नाही. मी ज्याच्याशी अगदी मन उघडं करून बोलेन, ज्याला ते सगळं कळेल, पटेल, असं कुणी कुणी नाही.

नाईट-ओव्हर!!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 11/01/2014 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.