Skip to main content

कथा

कथा — मराठी लघुकथा, दीर्घकथा आणि कथामालिकांचा संग्रह. मिसळपाव लेखकांच्या कल्पनाविश्वातील वैविध्यपूर्ण मराठी कथा येथे वाचा.

ती आणि तिचा भाऊ

लेखक kurlekaar यांनी मंगळवार, 18/03/2014 22:41 या दिवशी प्रकाशित केले.

ती आणि तिचा भाऊ
(ही लघुकथा ‘आश्लेषा’ च्या २०१३ च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झाली होती)

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/03/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.

एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

आय लव माय ईंडिया ..!

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 14/03/2014 18:47 या दिवशी प्रकाशित केले.

आज काहीतरी स्पेशल करायचे हे कालपासूनच ठरवले होते. दरवर्षीपेक्षा काहीतरी हटके, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे. रात्री बाराच्या ठोक्यालाच कामाला लागलो. जेव्हा कालगणनेनुसार तारीख पलटली.

थोडं समजून घ्या ना...!!!

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 14/03/2014 02:19 या दिवशी प्रकाशित केले.

'साली कोणीतरी पाहिजे यार!!!!'
'हं...'
'हे असं एकटं बोर होतं. त्यात आपल्याहून फडतूस लोकांना एकसोएक मिळतात ते पाहिल्यावर तर असली हटते ना... मग अजूनच एकटं वाटायला लागतं.'
'नाही ते खरंय... पण हे सगळं तू बोलतोयस? काल एवढं मोठं प्रवचन देत होतास मला की -'
'नाही म्हणजे मला मान्य आहे की कालच मी असं म्हणालो की, काय गरज आहे मुलींची?? मुलींशिवाय दुसरं काही नाहीये का जगात? त्यांच्याहूनही सुंदर अशा ब-याच गोष्टी आहेत!!'
'फॉर एक्झाम्पल??'

टाईमपास

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 10/03/2014 18:25 या दिवशी प्रकाशित केले.

"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

निरागस

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 28/02/2014 20:30 या दिवशी प्रकाशित केले.

पावसाचे अजूनही काही लक्षण दिसत नव्हते. लागोपाठ तिस-या वर्षी दिसणा-या दुष्काळच्या सावटाने लोक चिंताक्रांत होते.
" आज संध्याकाळी सगळी संगत पावसासाठी प्रार्थना करायला गुरुद्वारात जमणार आहे " सरदार सोहन सिंग शौकत अलींना सांगत होते.
" हो तेवढंच उरलंय आपल्या हातात, प्रार्थनाच करू शकतो आपण, जर ह्या वर्षीही पाउस आला नाही तर कठीणच दिसतंय सगळं " शौकत अली म्हणाले.
" आम्ही पण येऊ प्रार्थना करायला? शौकत अलींचा नातू रेहान मधेच म्हणाला.
शौकत अलींचे तोंड आश्चर्याने क्षणभर उघडेच राहिले, सरदार सोहन सिंगही गोंधळले.

जळक्या बोटांच्या मुलीच्या वहीची मायक्रो-गोष्ट

लेखक चिन्मय खंडागळे यांनी मंगळवार, 25/02/2014 02:46 या दिवशी प्रकाशित केले.

जळक्या बोटांची मुलगी धावतपळत बागेत येते.
आज आपल्याला उशीर तर झाला नाही ना, अशी शंका तिच्या मनात चुकचुकते आहे.
घाईघाईने ती इकडून तिकडे पळणारी मुलं, संथपणे एकेक पाऊल टाकत चाललेले आजीआजोबा, एकमेकांच्या हातात हात घालून रमतगमत फिरणारी जोडपी, या सगळ्यांमधून वाट काढत बागेच्या पश्चिम टोकाकडे येते.
तो अजून त्याच्या नेहमीच्या बाकावर बसला आहे. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो.
त्याचा डोळा चुकवून ती हळूहळू तिच्या नेहमीच्या बाकावर, त्याला सहज दिसणार नाही पण त्याच्यावर लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी जाऊन बसते.
मावळत चाललेल्या सूर्याकडे एकटक बघत तो बसलेला आहे.

चिंता

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 23/02/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.

''वंदनाला दोन दिवस फोन करत आहे पण ती उचलत नाही . mobile वर काहीच उत्तर येत नाहीये . तू जरा तिला फोन करून बघ ना. आणि मला कळव.''
मी केलेला फोन उचलला गे ला नाही तेव्हा वंदनाच्या मुलाला फोन केला . वंदना आणि तिचे यजमान कोकण ट्रीपला गेले असून दोन दिवसांनी येतील असे समजले .
काही मित्र मैत्रीणीना चिंतेची मिळालेली झुळूक मग एका नियमाला जन्म देऊन गेली .
'' कुणी गाव सोडून जाणार असेल तर एक दोन जणांना तरी details कळवायचे ''
प्रदीपचा कालच message आला.तो आणि बायको मेहुण्याच्या कारने देवीच्या दर्शनाला तुळजापूरला जात आहेत .पठ्ठ्याने कार नंबरही कळवला .