Skip to main content

कथा

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्यकथा आहे ओसाड व सर्व जंगलतोड झालेल्या व पाण्याचे सदैव दुर्भिक्ष असलेल्या एका दूरवर असणाऱ्या माळरानावरच्या एका पाड्याची, जेथे ५६ वर्षात स्वतंत्र भारत किंवा महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकारी पोचला नसेल! ही सत्यकथा आहे एकट्या शिलेदाराची, जो आपल्या या छोट्याशा पाड्यातून सर्वात प्रथम उच्च शिक्षण घेवूनही सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पाड्याला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या एका आदिवासी तरुणाची आणि त्याच्या उच्च ध्येयाची!

मद्दान

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 10/04/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली. त्ये काय असतंय बगाया लगी साळत. पोलिसमामाबी व्हते. राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत. मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार. मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी. मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत. आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून. म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.” आण्णा म्हन्ले, “जा घरी.” बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.” बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” आण्णा लटलट कापत व्हते.

वाड्यात.....२

लेखक गवि यांनी गुरुवार, 10/04/2014 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भागः वाड्यात....१ "केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला. मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची जाम म्हणजे जाम आठवण झाली. "चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो. "मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला.

ए टी एम मशीन !

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 04/04/2014 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार. "क्या टाईम हुआ साहबजी?" ......

अदलाबदल

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 04/04/2014 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले. वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार?

अशीच एक फँटसी..(२)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 31/03/2014 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फँटसी..(१) सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 31/03/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझं कोकणातलं गांव :- भाग-४ मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे..... तिथुन पुढे >>> दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु.

ओसाडवाडीचे ईलेक्शन..

लेखक नानासाहेब नेफळे यांनी रविवार, 23/03/2014 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच विषयाभोवती फिरायचा. गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं, तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते.

दल(ब)दल

लेखक जयनीत यांनी शनिवार, 22/03/2014 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
" मला माहीत होतं हा प्रश्न विचारल्या जाणारच! " पत्रकारांचा प्रश्न ऐकून नेताजी किंचितही विचलीत झाले नव्हते . " बघा माझ्यावरचा दलबदलूपणाचा आरोप हा काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत माझे विरोधक हा निराधार आरोप माझ्यावर नेहमीच लावत असतात, त्यात काहीही तथ्य नाही. उलट असल्या आरोपांनी माझी जनतेप्रती निष्टाच सिद्ध होत नाही का? तुम्हीच सांगा प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षाला निवडुन देते, दर निवडणुकीत जनतेचा कल बदलतो त्यात माझा काय दोष? आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी जनतेशी नाळ जुळलेला एक समान्य कार्यकर्ता आहे " नेताजींच्या चेह-यावर पुनश्च चिरपरिचित हास्य आले. टाळ्यांचा गडगडाट झाला.

अशीच एक फँटसी..(१)

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 21/03/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या. ..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे.