Skip to main content

अधुरि इक कहानी भाग-३

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता दिवस जाऊ लागले आणि मग पक्याला हवी ती संधी मिळाली....तिच्या घरी जायची ! संक्रांतीचा तिळ-गुळ द्यायला तेव्हा सगळी मुले-मुली १४जानेवरीच्या सायन्काळी परिचितांच्या आणि गावातील सगल्या शिक्षकांच्या घरी ही जात.पक्याच्या घरीही येत सगळी मुले-मुली.आणि या पेक्षा उत्तम कारण पक्या ला कुठले मिळणार होते? झाले पक्याची सकाळपासूनच तयारी सुरू होती.कुठला ड्रेस आज घालायचा यावर १० वेळा विचार करून झाला होता.केस ही अगदी तेल लावून चोपून कोंबडा बनवून बसवून घेतले होते ठीक ठाक. शेवटी एकदाची सायन्काळ झाली.एरवी पक्या आपल्या मित्रांसोबत जायचा पण आज त्याने सगल्याना चुकवून एकटाच तिच्या घरी जायचा निर्णय घेतला होता.उगाच मित्रांची अडचण नको! मनात प्रचन्ड धाकधुक ! अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता.आणि केव्हा तो येऊन पोहचला हे कळ्लेहि नाही त्याला.थोडीशी बिचकत बिचकत त्याने एंट्री केली घरात.त्याला वाटले होते की परिचय द्यावा लागेल,पण सरानी स्वता त्याचा परिचय कुटुंबाला करून दिला ! त्यासरशी एक छान मंद स्मित तिच्या सुंदर गालावर उमटलेले त्याने पहिले.त्याच्या मानावरचे दडपन दूर झाले,त्यानेही हसून छान प्रतिसाद दिला.ती त्या दोघांची एका अर्थाने पहिलीच भेट होती.न बोलता ही बरेच काही बोलणे झाले,असे पक्याला वाटून गेले. खूप खुश होऊन तो घरी परत आला.आता त्याला तिचे मंद स्मित सारखे आठवत होते. एरवी बाहेर जायला कंटाळा करणारा पक्या आज सकाळपासून इतका का उत्सुक होता आणि आता तर खूप खुश दिसतोय हे त्याच्या मोठ्या ताई च्या नजरेतून सुटले नव्हते.जरा वेळाने ताई ने त्याला गाठलेच! काय ! आज खूप खुश दिसतोय!काही विशेष! तिच्या नजरेला नजर न मिळवता पक्या म्हणाला...हो ना...आज सण आहे ना.! संक्रांत ! म्हणून.......आणि हे म्हणून स्वारी सटकली होती ताई च्या चौकशीतून! दुस-या दिवशी केव्हा एकदा त्या मित्राला भेटून सगळे सांगतोय असे झाले होते त्याला.तो मित्र शेजारच्या गावाहून इथे यायचा शाळेत ! मित्र भेटला एकदाचा आणि पक्याने सगळा ईतीवृतांत सांगितला.मित्र म्हणाला,चला म्हणजे आग उधर भी लगी है ! दोघेही मनसोक्त हसले. ह्ळु ह्ळु दिवस पास होत गेले.पक्याला बर्‍याच मित्रांकडून मनस्ताप ही सहन करावा लागला.कारण एक फूल और २ माली ! काही मित्रांना मुळी सहन होत नाही कुणाचे भले झालेले ! आणि या सगल्या प्रकाराचा त्रास सरळ मनाच्या पक्याला जरा जास्त च झाला.व्हायचे तेच झाले.पक्या चा १० विचा रिज़ल्ट त्याला हवा तसा नाय लागला! पक्या लाइफ मदे पहिल्यांदाच पहिल्या वरुन ३ र्‍या नम्बर वर फेकला गेला. पक्याला ही गोष्ट खूप लागली मनाला. त्याच्या इमेज ला प्रथमच धक्का बसत होता! सगळ्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे ओझे किती कठीण असते हे त्याला चांगले माहीत होते.पण आता उपयोग असा नव्हता. वेळ निघून गेली होती.एका पर्सेंट ने आपला पहिला क्रमांक गेल्याची रुखरुख त्याला लागून राहिली होती.प्रेमाची पहिली मोठी किंमत त्याने चुकवली होती ! क्रमक्ष:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1284
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया