Skip to main content

कथा

ती - ६

लेखक खटपट्या यांनी रविवार, 24/07/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती - २" "ती" - ३ "ती - ४" ती - ५ "ती" - ६ शेवटी अतुलला गाठलाच. सरळ विचारले काय चालले आहे. तर म्हणाला "काही नाही, इकडच्या तीकडच्या गप्पा" "काय रे अतुल, तु असा कीतीसा ओळखतोस नेहाला? तासनतास गप्पा मारतोस.

असे कधी घडत नसते

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच, तुमची चाल मंदावू लागते कितीही नास्तिक वा धीट असलात तरी, हलकेसे भय तुम्हास वाटू लागते. श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. शरीर थोडेसे घामेजू लागते. वळण ते पार होताच मात्र, तुमची स्थिती पूर्वपदावर येते. कधी तरी घरी पोहचता. घर जणू तुम्हाला आलिंगन देते. फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष. तुम्हास ते सारे खटकू लागते. तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची, तुम्हाला चिड येऊ लागते. कधीतरी होते सारे असह्य. तुमच्या तोंडून किंकाळी फुटते. माणसे, घर सारे... काहीच नाही! जणू विरून गेले, तुम्हाला जाणवते. 'ते' वळण अजुनही न सरले. खरंच, असे कधी घडत नसते?

एक कप कॉफी...

लेखक निखिल निरगुडे यांनी रविवार, 24/07/2016 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो बराच वेळ कसल्याश्या विचारात मग्न होता. आपण बराच वेळ टेबलावरच्या paper-weight शी उगाचच खेळतोय ह्याचं त्याला भानंच नव्हतं. अचानक मनाशी काहीतरी निर्धार करून तो जागेवरून उठला आणि थेट एका desk पाशी जाऊन थांबला. ताज्या फुलांचा मंद सुगंध त्या डेस्क पासून सुरु होऊन ऑफिस भर दरवळत असावा, असे त्याला उगाचच वाटले.

रिफील (शतशब्दकथा)

लेखक निओ यांनी रविवार, 24/07/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
रिफील बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले. बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला. दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता. झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला.. "काय करता रे!

नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....

लेखक Sanjay Kokare यांनी शनिवार, 23/07/2016 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते, गण्या: कुठ चाल्ला बे! राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो. गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे! राम्या: काय राजा गण्या तुले CET म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते. गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग?

एक ओपन व्यथा ७

लेखक वटवट यांनी शनिवार, 23/07/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148 एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475 एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610 एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node

कचरापेटी - शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 21/07/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले. दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली... मग लक्ष्ात आले की आपल्याला कच-याची इतकी सवय झाली असते की त्यात फुले जरी पडलेली असली , तरी आपण कचरा समजून ती फेकून देत राहतो.

नंदनवन

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 21/07/2016 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चंदीगढच्या त्यांच्या घरात गोरे-पान, नाकेले, उंच रैनाजी टी व्ही समोर बसून काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीविषयीची बातमी पाहत होते. समोरच सोफ्यावर तिशीतला मुलगा अविनाश आणि स्वयंपाकघरातून त्यांची पत्नी आरतीदेवी हेही लक्ष देऊन पाहत होते. काश्मिरी पंडितांचं हे विस्थापित कुटुंब. १९९० च्या अखेरीस अतिरेक्यांनी सोपोर मधल्या काली मन्दिराच्या केलेल्या विध्वंसानंतर तिथले पुजारी असलेले रैनाजींचे वृद्ध वडील आणि इतर रैना कुटुंबीय आधी दिल्लीला आणि तिथून चंदीगढला येऊन स्थिरावले होते.

बोट – Girl In Every Port

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 19/07/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते! वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात.

स्क्रिन शॉट भाग - ६

लेखक राजू यांनी सोमवार, 18/07/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे?