Skip to main content

कथा

एक ओपन व्यथा ४

लेखक वटवट यांनी शनिवार, 25/06/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३- http://www.misalpav.com/node/36148 __________________________________________________________________________ "तू लॉ ला का अ‍ॅडमिशन घेत आहेस?" " ………………" "अरे तुला इतकेपण कमी नाहीयेत रे मार्क्स" " ………………" "जाऊ द्या ना सर….

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 24/06/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

६३ गुणांचा योग +योग

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 23/06/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
याला योगायोगच म्हणातात ना! नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी योग दिवस साजरा केला. नमोजींची छाती ५६ इंचां पासून ७२ इंचाची झाली असेल. कदाचित् या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला. नमो सारखे योग करणे अस्मादिकांना तरी शक्य होणार नाही. योग म्हणजे जमा, जोड किंवा अंकांचा खेळ, काही हि म्हणा. असाच एक योगा + योग माझ्या आयष्यात ३० वर्षांपूर्वी आला. ३६ गुणांच्या जाळयात न कळत अडकलो. काय करणार, जूनचा महिना होता बाहेर चक्क ४५% तापलेले होते. अंगाची भयंकर लाही लाही होत होती.

बाप हाय मी - भाग 2

लेखक रातराणी यांनी बुधवार, 22/06/2016 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या तुमी कसं हायसा? तुमची लय आठवण यिती मला. लहानपणापासन तुमी मला कायबी कमी नाय केलं. ज्ये मागितलं त्ये दिलं. तवाचं तुमी मला शिकिवल आसत का नाय सम्द्या गोष्टी नाय मिळत, कवा कवा हराया बी लागतंय तर आज ह्यो दिसचं नसता दिसला. तुमची तरी काय चुक म्हणा. तात्या ह्या पाटलांच्या रक्तातच हाय ओ जिगर. त्ये प्रिन्सदादा बगा. कशात काय न्हाय तरी तुमच्या जिवावर उधळतय कडू. तेला म्हणाव जरा फाटक्या खिशान दोन दिस जगून तरी दाकीव. तात्या परश्या गरीब हाये पर मनान लय चांगला हाये तो. तेच्या ग्वाड मिट्ट सोभवान आमची सारखी भांडणं हूत्यात. पर तो लय खरा हाये ओ. आपल्या घरात कोण सुदीक नाय तेच्या एवढं चांगल आई सोडली तर.

कांचीवरम

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 21/06/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
कांचीवरम! रेशीम धाग्यापासून साडी विणण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले नगर! 'फुलांमधे जति, पुरूषांमधे विष्णू, स्त्रियांमधे रंभा आणि नगरांमध्ये कांची' असे महाकवी कालिदासही संस्कृतामध्ये ज्या नगराचे वर्णन करतो ते कांचीवरम. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तरीही सामान्याना ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य खर्‍या अर्थाने उपभोगता येत नाहीच. याचं मुख्य कारण म्हणजे सावकार-जमीनदारांनी सामान्य लोकांची चालवलेली पिळवणूक. व्यापारी लोकं स्वतःचा नफा वाढवण्यासाठी मजूरांना अगदी कमी मजूरीत प्रचंड काम करवून घेत आहेत.

पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली .

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 20/06/2016 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा शामराव : नसत्या उचापती : बैल पण गेला ,आणि झोप पण गेली . वडगावचा बैलाचा बाजार हा महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे .साधारणपणे पावसाळ्याच्या आधी जून महिन्याच्या सुरवातीला तो वडगावात भरतो . असाच दोन तीन दिवस तो आता भरणार होता . शामराव या बाजाराची फारच आतुरतेने वाट बघत होते . आज शामरावनी बैल आणण्या साठी बाजारात जाण्याचे ठरवले होते .त्यांचे अनेक वर्षा पासून मनांत ठरवलेले इप्सित आज पूर्ण होणार होते. ग़ेली चार वर्षे त्यांनी लोकांचा बैल मागून आणून आपल्या शेतीचे काम चालवले होते. अतोनात दिवस रात्र कष्ट करून ,एक एक पैसा गाठीला बांधला ,तेव्हां कुठे चार वर्षांनी तीस हजार रुपये साठले . आहो !

डबलक्लिक!!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 19/06/2016 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खा ! डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे! ========================================================== तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट. खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो.

चॉकलेट

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 13/06/2016 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्याने, छ्या. चकमक चकमक रात्र होती. अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली. जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर. मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय? तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला. साल्या माचीस मागितलं रे.

ऊब [लघुकथा]

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 12/06/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार भीषण पसरला होता. भयाण वारा सुटला होता. उंच उंच माडी अन बाहेर मी उभा मी दारावर टकटक केले. मंद दिवा जळत होता. त्याचा प्रकाश फटीतून बाहेर पडत होता. मी वाट बघितली. कुंपनाजवळून जात खिडकीखाली उभा राहिलो. टाचा उंचावून आत बघितलं. काहीच हालचाल नाही. मग पायरीवर बसून राहिलो. एक विडी शिलगावली. पुन्हा एकदा धुळीची वर्तुळं. मी उठून पुन्हा टकटक केलं. यावेळी जरा भीतीच वाटली. मग उभा राहिलो तसाच. बोचऱ्या थंडीनं अंगावर शिरशिरी आली. पाऊस पडणार आज. दार अजूनही बंदच. आता काय? टपोरे थेंब कोसळत राहिले. गढूळ पाण्याचे झरे खळाळू लागले. माडीभोवती तळं साचलं. अंग चोरुन मी पायरीवर निजलो. अगदी दरवाज्याला खेटून.

ड्रॅगन....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 12/06/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, ही गोष्ट चीनमधील किअांग्सू प्रांतातल्या हुआई गावच्या वू चेंगने लिहिली. त्याचा काळ कुठला होता हे ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणत: १५०५ ते १५८० दरम्यान हा होऊन गेला असावा. तो त्या काळातील एक बर्‍यापैकी प्रसिध्द कवी आणि लेखक होता. मींग राजदरबाराच्या बखरीत त्याचा आणि त्याच्या काही काव्यांचा उल्लेख सापडतो. या महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय ह्युएन्संगाची भारतातील यात्रा हा आहे. ही व्यक्ती अर्थातच काल्पनिक नसून खरी आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून इतिहासात प्रसिध्दी पावलेला प्रवासी हयुएन्संगच आहे. तो ७ व्या शतकात होऊन गेला.