Skip to main content

कथा

परिसस्पर्श : यशोगाथा एका व्यावसायिकाची ( सुधारीत )

लेखक जयनीत यांनी रविवार, 12/06/2016 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
सेठजींनी पदार्पण केले एका नव्या कर्यक्षेत्रात मनोरंजनाच्या उद्योगात मोठं नव्हतं नाव त्यांच ह्या नव्या व्यवसायात तारखा मिळेनात त्यांना बड्या तारे, तारका, दिग्दर्शकांच्या पण मागे हटणे नव्हतेच सेठजींच्या स्वभावात त्यानी निर्णय घेतला सिरीयल बनवण्याचा अनुभव प्राप्त करण्याचा उद्देश तर होताच ह्या क्षेत्रातही संधी दडल्या होत्या व्यवसायाच्या अपरिमीत समस्या आलीच त्यांना इथेही बड्या दिग्दर्शक, तारे, तारकांच्या तारखांची पण थांबले ते सेठजी कसले त्यांनी सुरवात केली हाती धरून एका नव्या दिग्दर्शकाला मालिकेची सुरुवात होती आश्वस्त करणारी एकसुरी मालिकांच्या गजबजाटात एक नवा प्रयोग एक नवा दृष्टीकोन विषयाची हाताळणी

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 12/06/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो होतो. आजोबा वैद्य होते. त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता. आजोळी पोहचल्यावर पहिले दर्शन एका भल्या मोठ्या कुत्र्याचे झाले. त्याला पाहून भीती वाटली. पण मामा म्हणाला, अरे हा कुत्रा फकीर आहे, कुणाला काहीच करत नाही. गल्लीतल्या मरतुकड्या कुत्रांसमोर हि शेपूट टाकतो. मामाचे म्हणणे खरेच होते.

शृँगार १६

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 11/06/2016 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस वाईट गेला , रात्री झालेल्या खराब झोपेमुळे मूडही खराब होता . दुपारी मंजूला फोन केला पण फारसं काही बोलली नाही ती . नेहमी इतकी बोलते , काही नाही तरी राग राग करते तस आज काहीच नाही . एकदम चुकल्या-चुकल्यासारखं वाटल . अशी का वागली असेल ती ? या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं . दिवसभर याच विचारामुळे कामातही लक्ष लागलं नाही . याच विचारात घरी पोहोचलो . मंजूला एक-दोनदा फोन केला तर तिने काही उचलला नाही . त्यामुळे मला आता जास्तच काळजी वाटू लागली . याच विचारात होतो तेव्हढ्यात मागे कोणाचीतरी चाहूल जाणवली म्हणून मागे वळून पाहीलं तर राधिका उभी होती . " अग तू ? कशी आहेस ? " " तुम्ही ठीक आहात ना ?

कशी सांगावी मी वेदना प्रिये....

लेखक सुंड्या यांनी शनिवार, 11/06/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
गर्मीचे दिवस होते, फाल्गुन महिन्याच्या तेव्हढ्यातच बादशहा-सलीमाचा नव-विवाह झाला होता. नव्या नवरीसह आनंदाचे क्षण घालविण्यासाठी बादशाह राजकारभाराच्या जंजाळापासून दूर काश्मीरच्या दौलतखान्यास आले होते. रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला होता, बाहेर रात्र चंद्रप्रकाशात भिजून निघाली होती. त्या चांदण्यांत दूरवरची हिमशिखरे काळोखात अधिकच शुभ्र होऊन सुंदर दिसून राहिली होती. आरामबाग महालाच्या खालच्या बाजूस असलेली पहाडी नदी वळण घेत वाहत होती. मोतीमहालाच्या एका दालनात शमादान जळत होते आणि त्याच्या एका उघड्या गवाक्षाजवळ बसलेली सलीमा त्या चांदण्यारातीच सौंदर्य निरखून राहिली होती.

घर क्रमांक – १३/८ भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/06/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ भाग - १ घर क्रमांक – १३/८ भाग - २ घर क्रमांक - १३/८ भाग - ३ घर क्रमांक – १३/८ भाग - ४ ..... त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की मी भेटल्यानंतर ते एकदा त्या घराला भेट देऊन आले होते व तेथे त्यांना ती दोन पत्रे सापडली. त्यांनी ती वाचली देखील. ती वाचल्यानंतर त्यांनी त्या बाईबद्दल थोडीफार सावध चौकशीही केली.

चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 11/06/2016 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो). अत्यंत तोडके कपडे घातलेल्या, ३६-२४-३६ कमनीय देहयष्टीच्या या चिअर्स सुंदरी त्यांच्या टीमच्या फलंदाजाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारा सोबत मंचकावर येऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करत नृत्याचे हावभाव करतात. दर्शक त्यांचे नर्तन पाहून शिट्या वाजवितात, टाळ्या पिटतात. जो पर्यंत टीम जिंकत राहते, चिअर्स सुंदरी हि टीम सोबत विमानात प्रवास करतात, उंची हॉटेलात राहतात, बोनस, उपहार आणि अन्य अनेक पुरस्कारांचा वर्षाव या सुंदरींवर होत असतो. पण एकदा टीम हरली कि चिअर्स सुंदरीं हि बेरोजगार होतात.

बेधुंद (भाग १३)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या अन हर्षलाची मन्न बाकीच्या नजरेत नाही , पण एकत्र झाली होती . अक्षा अन शिवेका एकमेकांकडे बघत असत पण काहीही बोलत नसत ! त्यात अक्षाला समजले की शिवेका विद्यापीठ सोडून जात आहे , चौथी सेमिस्टर आता संपत आली होती ! चौथी सेमिस्टर चोरून एकमेकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या करण्यात गेली . हर्षला 'फ़ाइव्ह स्टार्स' मध्ये आली आहे हे फक्त हर्षला अन फ़ाइव्ह स्टार्सलाच माहित होत . परीक्षा संपली होती . शिवेकाने तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या विद्यापीठात जायचा निर्णय घेतला होता , कदाचित 'प्रेम अन मजबुरी' अशी दोरीवरची कसरत तिला झेपत नव्हती !

बेधुंद (भाग १२)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षलाच्या वेडेपणात नित्याची तिसरी सेमिस्टर कशीबशी सरली . त्यातच ज्याने नित्यासाठी हर्षला चा बायो डाटा आणला होता तो निलेश अन हर्षला चांगले मित्र झाले होते . देखणा निलेश सगळ्यातच पुढे होता , अभ्यास , खेळ अन त्याच व्यक्तिमत्व अन त्याची 'हेअर स्टाईल ' कोणत्याही मुलीला आकर्षित करायला पुरेशी होती . त्याची उंची जरा नितेश पेक्षा कमी होती पण हर्षला पेक्षा थोडी जास्त होती . नित्या निलेशला काही बोलत नव्हता अन बोलणार तरी कसं ? एखाद्या पोरीला माझ्यावरच प्रेम कर अस कोण सांगू शकेल ?

बेधुंद (भाग ११)

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 11/06/2016 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
(बऱ्याच दिवसाने वेळ मिळाल्याने सलग तीन भाग टाकतोय …! कदाचित तारा उडण्याची शक्यता आहे ! ) नित्याचे दिवस हर्षलाची स्वप्न बघत सरत होते , नित्या अजूनच हर्षलासाठी वेडा झाला होता ! कधीकधी एकटाच बाल्कनीत बसून शून्यात बघत असे ! भांडखोर , मस्तीखोर नित्या शांत शांत वागायला लागला होता , कधीकधी तो तिला बघण्यासाठी 'लायब्ररीत' ही जाऊ लागला . काय असत हे प्रेम ? अजून एकदाही तो हर्षलाला बोलला नव्हता पण तरीही त्याला ती आपली वाटू लागली होती . 'विषय' हर्षलाचा अवघड असल्याने कुणी तिच्यावरून त्याला साधं 'चिडवायाची' पण हिम्मत करत नसत !