Skip to main content

कथा

बादलीयुद्ध ४

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 07/08/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन , तीन ------------------------------------------------------------------------------- चपातीयुद्ध मेसमधल्या जेवणात सुकी भाजी जास्त मिळत नाही या एकाच कारणास्तव आम्ही मेस बदलली. चांगली मेस गावात होती. म्हणूनच आम्ही काकाला दुपारी होस्टेलवर डबे घेवून यायची शिफारस केली. डब्यात सुकी आणि पातळ अशा दोन्ही भाज्या जास्तच चविष्ट असायच्या.

प्रतिक्षा......

लेखक एक एकटा एकटाच यांनी शनिवार, 06/08/2016 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************************************************** नमस्कार मित्रहो..... मी माझी नवीन कथा तुमच्यासमोर सादर करतोय. माझ्या इतर कथेप्रमाणेच ही कथा ही एकसलग आहे त्यामुळे कथेची लांबी जास्त आहे. निवांत वाचा................ धन्यवाद एक एकटा एकटाच ******************************************************************************************** आकाश ऑफीसमधे आपल्या टेबलावर हातातलं पेपरवेटशी चाळा करीत विचार करीत बसला होता. ऑफिसनी दिलेल्या ऑफरने त्याला एका संकटात टाकलं होतं.

जिना यहा मरना यहा....

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/08/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम्याचा दिनक्रम तसा ठरलेला होता. सकाळी उजाडण्याआधी उठायचं. आवरून झाल्यावर, अंबादेवी संस्थानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडायचे, हळूहळू इतर कक्ष उघडायचे. मग मंदिराचा पूर्ण परिसर, सर्व कक्ष,सभामंडप,महाप्रसादाचा कक्ष,गाभाऱ्यासमोरचे प्रार्थनाकक्ष झाडून स्वच्छ करायचे. भक्तांसाठी लागणारे पाणी भरून ठेवायचे, देवीच्या गाभाऱ्यात लागणारे पाणी आवारातल्या विहिरीतून शेंदून ठेवायचे. गाभाऱ्यातील साफसफाई त्याला सांगितली तरच तो करायचा. गाभाऱ्यात स्वतःहुन तो कधीही जात नव्हता. अर्थात त्याच्यावर असे कोणतेही बंधन नव्हते. पण गाभाऱ्यात जाताना नेहमीच त्याला एक अनामिक भीती वाटायची.

हरवलेलं विश्व (भाग २)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 06/08/2016 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होणा-या अनाऊन्समेंटमुळे जयूची झोपमोड झाली. विमान कैरो विमानतळावर उतरत होते. जाग आल्यावर क्षणभरासाठी जयु गोंधळली आणि मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिच्या चेहे-यावर मंद स्मित तरळल. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशी पूर्णपणे एकटी बाहेर पडली होती. आणि ते ही परदेशात. ती सुशुक्षित होती त्यामुळे ती एकटी फिरू शकेल याचा तिला आत्मविश्वास होता... आणि म्हणूनच ती स्वतःवरच खूप खुश होती. विमानातून उतरून तिने स्वतःचं सामान ताब्यात घेतल आणि बाहेर आली. तिच्यासाठी तिथे एक स्पेशल टॅक्सी उभीच होती. साधारण सकाळचे 8/8.30 झाले होते. पण वातावरण चांगलच तापायला लागल होत.

एक ओपन व्यथा ८

लेखक वटवट यांनी शनिवार, 06/08/2016 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148 एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475 एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610 एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/08/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे. वीज गेली. पंखा हि बंद झाला. इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो. एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ.

बेधुंद (भाग - १४ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 06/08/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
(बऱ्याच दिवसानंतर ... ! मलाच माहित नाही की हा भाग टाकायला एवढा उशीर का लागला ? ) धन्यवाद - एखादे पुस्तक वाचतोय/ वाचतेय असे वाटतेय अशा संदेशाबद्दल ! तरीही ' मिपा ' वर असल्याने ह्या भागाच्या आधुनिक शॉर्ट 'हिंग्लिश' ने होणाऱ्या शेवटामुळे ( अती ) शहाण्यांच्या प्रतिकियासाठी शुभेच्छा ! ) ............. नित्याशी बोलणं झाल्यावर आंधळ्या मनानं , अक्षा सरळ बसमध्ये बसला अन घरी आला ! घरी आल्याने आई खुश होती अन सहजकीचं त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते .

उक्षुम्बाई !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 04/08/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रभर पावसाची रिपरिप चाललेली..टिनपत्र्याच्या खोलीच्या छतावर होणार टनटन आवाज..खोली कसली?

बादलीयुद्ध ३

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 02/08/2016 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन ------------------------------------------------------------------------------- मी बादलीचा बादली माझी मी बादलीतल्या 'मगा'चा 'मग' माझ्या बादलीचा आपण एक प्रथितयश कवी होऊ शकत नाही ही माझ्या हृदयातली एक भळभळती जखम आहे. चित्रं काढता काढता मला कविता करण्याचा नाद लागला. नादच.

ती - ७

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 02/08/2016 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
"ती" "ती" - २ "ती" - ३ "ती - ४" ती - ५ ती - ६ ती - ७ बोरीवलीहून निघालो ते थेट घरी आलो पण येताना डोक्यात असंख्य विचार चालू होते. आपल्या हातून हे झालंच कसं.