Skip to main content

रिफील (शतशब्दकथा)

लेखक निओ यांनी रविवार, 24/07/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
रिफील बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले. बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला. दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता. झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला.. "काय करता रे! कसं काय दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन पेन्सिल आणि खोडरबर लागतं." पोरीनं कसं तरी हसून वेळ मारून नेली पण बारका मांडीवरची सॅक खाली आपटून गाल फुगवून बसला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4304
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

जीवन-वर्तुळाचं चांगलं चित्रण.

पण कथेत शिर्षक वगळता केवळ ९९ शब्द आहेत

CBSE kdhun International school Kara. Shabd purn hotil. Katha changaliye.

मी पण एक रिफिल लिहीन म्हणतो. पण नको, प्रा.डॉ. क्रिप्टिक म्हणतील

In reply to by विनायक प्रभू

देवाची शप्पथ नाय म्हणनार. लिहा. -दिलीप बिरुटे

मस्त आवडली कथा. -दिलीप बिरुटे

छान.

मोजक्या शब्दात प्रचंड परिणामी

छान! कथा आवडली!