दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 4:37 pm

दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

शाळेसमोरच्या रस्त्यावर अलिकडेच एक नवीन दुकान सुरु झाले होते . या दुकानामध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमा/टिव्ही कलाकार , खेळाडु यांचे छोटे मोठे फोटो विकायला ठेवलेले असत . मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आवडत्या कलाकारांचे , खेळाडुंचे फोटो विकत घ्यायला मुलांची भरपुर गर्दी होत असे . शाळेतील शिक्षकमंडळी या गर्दीकडे नाराजीने बघत जात असत . शाळेतील हुशार मुले या गर्दीकडे बघुन नाक फेंदारत असत , तर हुशार मुली या गर्दीकडे बघुन न बघितल्याचा आव आणत .

आज शाळेतील मधली सुट्टी संपत आली होती . मन्या आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या गेटपाशी उभा राहुन गप्पा टाकत होता . अचानक त्यांची नजर समोरच्या दुकानातुन येत असलेल्या डावक्याकडे गेली . डावक्याने दुकानातुन भरपुर फोटो खरेदी केले होते हे त्याच्या हातातल्या गठठ्यावरुन दिसत होते .

डावक्याची खेचण्याचा हा एक नामी मौका आज मित्रांना मिळाला होता . डावक्या जवळ येताच मन्या जोरात म्हणाला-

"खल्लास . पोरंगं काय आता ऐकत नाही ल्येगा . आज काय एकदम राडाच ."
"नुस्ता राडा नाही . ह्यो तर एकदम धुरळाच हाय धुरळा" दुसरा मित्र अजाने री ओढली .
"काय डावक्या , आज जोरदार खरेदी . कुणाला गिफ्ट बिफ्ट ? काही खळबळ ?" अश्क्याने विचारले .

आज काल कॉलनीतल्या कॉलेजल्या जाणा-या पोरांबरोबर राहुन मन्या आणी मित्रांनी हि नवी बोलीभाषा उचलली होती. जरी अर्थ नीट माहित नसला तरी जमेल तसा या भाषेचा वापर हि मंडळी करत होती.

या अचानक झालेल्या हल्ल्याने डावक्या दोन मिनीटं गडबडुन गेला . पण तोही या खेळातला माहिर खेळाडु होता . त्याला एकुण प्रकार लक्षात आला . मग स्वताला सावरुन त्याने उत्तर दिले .

"बोल दिया ? हे फोटो मी ताईसाठी घेतले आहेत . तिनेच मला आणायला सांगितले होते."

"अस्सं . शाब्बास रे भाउराया . तु खरा भाउ नंबर वन आहेस . पण हे नक्की खरं का ? का बिलं तेव्हढी ताईच्या नावावर फाडतोस ?"
" नाही बा . आपण आपल्यासाठी फक्त सचीन तेंडुलकरचे फोटो घेतो . तोच आपला क्रिकेटचा देव आहे . एक खरा सचीन .. बाकी सारे नुसतेच .. बाकी सारे नुसतेच .."

असं काहीतरी म्हणत डावक्या न ला न जुळवणार होता , तेव्हढ्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली . सर्व पोरं आपापल्या वर्गाकडे जाउ लागली . जाताना डावक्याने मन्याला आठवण केली .

"मन्या , आपली बॅट , बॉल , स्टंपसची जुळणी झाली आहे . आपण सगळे या रविवारी क्रिकेट खेळायला जाउ ."

नुकतेच क्रिकेटचे वर्ल्डकपचे सामने सुरु झाले होते . त्यामुळे सारा माहौल क्रिकेटमय झाला होता . मुलं जसा मोकळा वेळ मिळेल तसा क्रिकेट खेळत होती . वर्गामध्ये लिहण्याचे पॅड बॅट म्हणुन आणी छोटा रबरी बॉल नसेल तर रुमालाची गुंडाळी बॉल म्ह्णुन वापरली जात असे . बाहेर खेळताना वेळप्रसंगी भिंतीवर विटकरीने तीन रेषा आखुन नाही तर सायकलीच्या मागचे चाक हे स्टंपस म्ह्णुन वापरत असत . बॅटिंगचा क्रम हा बॅटच्या पलीकडे वाळुवर रेषा आखुन नाहितर एकाच्या पाठिवर थापा मारुन ठरवला जात असे . त्यातही पहिला डाव हा हमखास देवाला असे .

मन्या , डावक्या आणी त्यांचे मित्र रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जवळच्या एका मैदानावर क्रिकेट खेळु लागले .

असेच एका रविवारी त्यांचे मैदानावर क्रिकेट खेळणे चालु होते . थोड्या अंतरावर दुसरी एक टिम क्रिकेट खेळत होती .
खेळताना , कधी बॉल अडवताना, दोन्ही टिम मधल्या खेळाडुंचे एकमेकांना धक्के लागत , आणी तेव्हा दर वेळेला वाद होत असत . असे दोन तीनदा घडल्यावर त्या टिमचा कप्तान संथ गतीने चालत वादाच्या ठिकाणी आला .

"गबन्याभाई आला . गबन्याभाई आला ." त्या टिममधली बाकिची पोरं आपपसात कुजबुजली . एकंदर गबन्याचा त्या टिमला चांगला धाक होता . तिथं येउन गबन्या जोरात ओरडला .

"अरे भिडु लोग , तुम्हाला एवढी खुन्नस असेल तर आमच्याशी दस दस की मॅच खेळा . होउन जाउ दे टशन ."

आमिर खानच्या 'गुलाम'मुळे 'दस दस की दौड' हा प्रकार मन्या , डावक्या आणी मित्रांना माहित होता . तरी 'दस दस की मॅच' म्हणजे दहा दहा ओव्हर्सची मॅच हे त्यांनी ओळखले . त्यांचीही तयारी होती .

"दस दस की काय आम्ही तर सौ सौ की मॅच सुद्धा खेळु . सरत मंजुर है . होउन जाउ दे लगान मॅच" आता मन्या , डावक्याची टिमही पेटली होती .

"चला तर मग . आम्ही आहोत विजय कॉलनीतले हुकुमाचे एक्के . आमच्या टिमचे नाव आहे इलेव्हन फायटर्स ." गबन्याने ऐटीत सांगितले .

"आम्ही आहोत प्रताप कॉलनीतले पट्टेरी पठ्ठे . आमच्या टिमचे नाव आहे इलेव्हन टायगर्स " मन्यानेही रुबाबात सांगितले .

गमतीची गोष्ट म्हणजे दोन्ही संघांकडे जेमतेम आठ , नऊच मेंबर होते . त्या नवांतलाही एक जण लिंबु टिंबु असल्याने तो आपसुकच जमेतुन बाद झाला .

अशा रितीने दस दस की मॅचला सुरुवात झाली .

--------------------सुरुवात----------------काल्पनीक--------------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

1 May 2016 - 4:58 pm | जव्हेरगंज

खाली क्रमश: का लिहिले नाही?

आमचा केवढा मोठ्ठा पोपट झाला !

सिरुसेरि's picture

1 May 2016 - 6:05 pm | सिरुसेरि

क्रमश: च्या जागी "सुरुवात" असे लिहिले आहे .

कानडाऊ योगेशु's picture

1 May 2016 - 7:04 pm | कानडाऊ योगेशु

सुरवात जोरात. और आन्दो!

अभ्या..'s picture

1 May 2016 - 7:10 pm | अभ्या..

मस्त मस्त.
ते क्रमश: टाका की.
(नंतर काय टाकलं नायतरी चालतय म्हणा, उगी हवा करायची. ;) )

झकास सुरुवात....

पुभाप्र...

नाखु's picture

2 May 2016 - 10:23 am | नाखु

पुढचा भागा

४ जागा धरलेला नाखु

सिरुसेरि's picture

2 May 2016 - 11:38 am | सिरुसेरि

आपणा सर्वांचे मौल्यवान प्रतिक्रियांबद्दल आभार .

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 2:51 pm | विजय पुरोहित

कथा चांगलीच आहे. हरकत नाही. पण तुमचं नाव दिसलं की काहीतरी अमानवीय, गूढ, भयकथा वगैरे वाचायला मिळेल असं वाटतं. तेवढं घ्या मनावर.

सिरुसेरि's picture

3 May 2016 - 11:11 am | सिरुसेरि

जरुर . धन्यवाद सर .

बाबा योगिराज's picture

3 May 2016 - 11:37 am | बाबा योगिराज

तुमच्या आधीच्या कथा वाचल्या होत्या, त्या आवडल्या होत्या. तुमची लेखन शैली मस्त आहे.
अपेक्षा वाढलेल्या आहेत.

आपला वाचक
बाबा योगीराज

सिरुसेरि's picture

4 May 2016 - 11:06 am | सिरुसेरि

आभारी आहे . पुर्वी "मालगुडी डेज" सिरीअलमध्ये "स्वामी आणी मित्र" अशा प्रकारच्या कथा पाहिल्या मिळाल्या होत्या . तशा प्रकारचे काहितरी लिहायचे होते . या कथेमधुन क्रिकेट मॅचच्या वर्णनापेक्षा त्या मॅच निमित्ताने होणारे मुलांचे दंगे , वाद याबदल लिहिण्याचा हेतु आहे . बघु कसे जमते ते .

हकु's picture

4 May 2016 - 12:05 pm | हकु

येऊद्या.