Skip to main content

कथा

नितंबावतीची कथा.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 29/11/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
...सारंगची भानगड ऐकून मित्रमंडळीत एकदम गडबड उडाली. मध्यमवर्गीय मानसिकता असलेल्या आमच्या मित्रमंडळींची फार मोठी पंचाईत झाली खरी. त्याला आता कसे सुनवायचे, किंवा त्याची मित्रमंडळींतून कशी हकालपट्टी करायची याबद्दल एकत्र व खाजगीत चर्चा झडू लागल्या. खरे तर त्याचा हा वैयक्तिक प्रश्र्न होता आणि आमच्यापैकी कोणालाही त्यात नाक खुपसायची गरज नव्हती. पण समाजाच्या संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावरच असल्यासारखी आमची मंडळी व त्यांच्या बायका वागत होत्या. सारंगने सध्याच्या नैतिक अधिष्ठानाला जोरदार धक्का दिला व आमच्या मित्रमंडळींना व त्यांच्या बायकांना तोंडघशी पाडले.

विदाऊट अ ट्रेस - २ - स्टार टायगर आणि स्टार एरीयल

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 28/11/2016 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace 2 - Star Tiger and Star Ariel १९४८ सालचा जानेवारी महीना.. पोर्तुगालची राजधानी असलेल्या लिस्बन इथल्या विमानतळावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची लगबग सुरु होती. नुकत्याच आटपलेल्या दुसर्‍या महायुद्धात पोर्तुगालचा सत्ताधारी सालाझारने जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांकडून येणार्‍या दडपणांना बळी न पडता पोर्तुगाल तटस्थ राखण्यात यश मिळवलं होतं. महायुद्धात तटस्थ राहील्याप्रमाणे युरोपातल्या इतर राष्ट्रांप्रमाणे पोर्तुगालला युद्धाची झळ बसली नव्हती. त्यातच लिस्बन हा पोर्तुगालमधला सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने देशोदेशीचे - मुख्यतः युरोपातले प्रवासी इथे मोठ्या प्रमाणावर दिसत होते.

२६-११शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 26/11/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजचाच दुर्देवी दिवस होता तो.. मी आणि माझी लाडकी लेक इथेच या स्टेशनच्या बाकावर बसलो होतो , आणि अचानक आम्हाला गोळ्यांचा आवाज एकू येऊ लागला. काही कळण्याच्या आधिच एक गोळी छकूलिच्या आरपार निघून गेली. क्षणार्धात माझ्या छकूलिला मी गमावलं होतं दहा मिनिटात प्रतिहल्ला करणा-यासाठी पोलिसांची एक टिम आलेली होती. थोड्याच वेळात त्यातल्या इनस्पेक्टरलाही गोळी लागली. बदला घेण्यासाठी मी पळत जाऊन त्याची पिस्तुल उचलली आणि त्या नराधमाकडे रोखली. र्िटगर दाबताच गोळीचा जोरदार आवाज कानी घुमला. पण..पण ती गोळी माझ्याकडुन सुटलेलीच नव्हती.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ८)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/11/2016 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या काळजी वाटण्याच्या आठवणी फोनवर म्हटल्याप्रमाणे सुम्याची मुलगी थोड्या दिवसासाठी कोकणात आली होती.तिचा मुलगा आता कॉलेजात जात असल्याने तो आपल्या आपण स्वतंत्रपणे रहात होता.नवर्‍याला आणि मुलाला तिने सांगीतलं की,मी आईकडे असे पर्यंत तुम्ही दोघं संभाळून रहा. इकडे कोकणात आल्यावर आईची प्रकृती पाहून तिची मुलगी खूपच अचंबीत झाली.आपली आई जास्त दिवस काढणार नाही असं तिला वाटूं लागलं.एकदा तिच्याशी सवित्सर बोलून तिला विचारावं की तू आणि गुरूकाका मुंबईला माझ्याबरोबर यायला तयार अहात का?माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहाल आणि मलाही माझी कामं करता येतील.नाहीतर तुमची काळजी करून माझं लक्ष कामापासून सतत विचलीत ह

अमर - कथा

लेखक jp_pankaj यांनी शुक्रवार, 25/11/2016 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला. ***************************************************************************************** .केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता. केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा. पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची.

विदाऊट अ ट्रेस - १ - लॉस्ट कॉलनी

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 25/11/2016 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace अनादी अनंत कालावधीपासून मानवाला अज्ञात प्रदेशाचं कायम आकर्षण राहीलेलं आहे. जास्तीत जास्तं भूमीवर आपलं स्वामित्वं प्रस्थापित करावं ही सहज मानवी प्रवृत्ती हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. इसवीसनापूर्वीपासूनच भूमध्य समुद्राच्या सान्निध्यात ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृती पूर्णत्वाला पोहोचलेल्या होत्या. पूर्णत्वास गेलेल्या या संस्कृतींना नित्यनवीन प्रदेशाची आस होतीच! अलेक्झांडरने भूमध्य समुद्र ओलांडून पर्शियन साम्राज्य काबिज करुन भारतावर केलेलं आक्रमण या विस्तारवादी मनोवृत्तीचाच परिपाक होता.

शंभो

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/11/2016 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
जोगव्यानं त्या सकाळी गहिरे रंग भरले होते. मुग्धाळला पहाट गारवा उष्ण तांबूस किरणांत निथळत होता. पाणवठ्यालगत गुलाब ताटव्यांचे राज्य होते. मंत्राग्नी पुटपुटत त्याने हवनकुंडात स्निग्ध सोडला. उठून एकवार त्या महान तेजोवलयाकडे पाहिले. "बस्तीर" कमलपात्राच्या जलधारा हातावर सोडत तो उद्गारला. सेवकानं वाकून मानाचा मुजरा केला. "एक ऊफाळता चहा" समाधीवस्थेत जोगव्याने सिंहासन ग्रहन केले. एक पाय उकिडवा सोडत तो गरजला, "नाउ" खलित्यावरील राजमुद्रा उठून दिसत होती. दरबानानं तेजोवलय भडकवले. "हिकडं येक कटींग.." काळ गोठावला होता. राजधानीची चारी चक्रे रुतून बसली होती.

संभ्रम-ध्वनी (कथा)

लेखक चॅट्सवूड यांनी मंगळवार, 22/11/2016 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती. कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली. कार्तिक त्याच शहरातला, आई वडीलांन बरोबर राहणारा.

अवजार

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 22/11/2016 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी : मैथिली , माकडीचा माळ , शिट्टी ________________________________________ संध्याकाळ होत आली तसं हरी गाढाव जोंधळ्यात शिरलं. आत शिरल्यावर बऱ्याच वेळानं दोनदा खिकाळलं. मग बाहेर आलं. इकडं तिकडं बघितलं. जाग्यावरंच दोन उड्या हाणल्या. आन पुन्हा एकदा जोंधळ्यात शिरलं. यावेळेस मात्र जरा बेतानं खिकाळलं. समोरच्या झुडपात बसलेलं भानूकुत्रं भेदरुन गेलं. त्यानं थोडं बाहेर येऊन मान खाली घालत त्या जोंधळ्यावर बारीक नजर ठेवली.

काळरात्र (भाग ५) आयझँक असीमोव्ह

लेखक विचित्रा यांनी सोमवार, 21/11/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
शीरीनने आपलं बोलणं सुरु ठेवलं. " जेव्हा आपले अवकाशसंशोधक लगाशग्रहाच्या भ्रमणकक्षेचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कि या कक्षेवर दुसर्या अवकाशवस्तूचा प्रभाव पडतोय. पण हा अवकाशगोल लगाशसारखाच प्रकाशरहित असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही." " लगाशभोवती फिरणार्या त्या गोलाला चंद्र म्हणतात, हे माहित आहे सगळ्यांना." " बरोबर. तर, हा चंद्र एका विशिष्ट वेळी, बरोबर बीटा सुर्याच्या रेषेत येतो.त्याच्या सावलीमुळे बीटा तारा पूर्णपणे झाकला जातो. याचवेळी इतर सूर्य विरुद्ध गोलार्द्धात असल्यामुळे लगाशवरच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार पसरतो." " ग्रहण म्हणतात त्याला.