ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा..
आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे..
मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!)
"तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले.
मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली.