भेट आभाळांची..!
राम राम मंडळी,
आज सचिनचा वाढदिवस.. सर्वप्रथम त्याला सार्या मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..
इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. त्याकरता मॉर्गनसारखे दिग्गज समर्थ आहेत.. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल.. कारण अण्णा तेव्हा हवाईगंधर्व म्हणून कार्यरत होते!
ती आठवण अशी होती, की सचिन एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,
"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'
मंडळी, 'गुणीजन जाने गुणकी बात' असं म्हणतात ते खरंच.. वास्तविक जेव्हा ही भेट झाली तेव्हा सचिनच्या ऐन भरारीचा तो काळ होता, सचिन घडत होता.. पण त्याला अभिवादन केलं ते एका सिद्ध पुरुषाने, एका योग्याने, एका स्वरभास्कराने! तेही आपल्या मानमरातबाचा, वयाचा, नावाचा कसलाही मोठेपणा न बाळगता! एक भारतरत्न, तर एक होऊ घातलेलं भारतरत्न! :)
मंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!
-- तात्या अभ्यंकर.
मंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!
-- तात्या अभ्यंकर.
याद्या
10011
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात
+१
In reply to क्या बात by भोचक
+६
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
छान आठवण
भारतरत्न
In reply to छान आठवण by मदनबाण
खरोखरच दोन
ही भेट
तुम्ही
छान आठवण
अप्रतीम आठवण
सहमत आहे
या निमित्ताने
In reply to सहमत आहे by सन्जोप राव
हो,
In reply to या निमित्ताने by मिसळभोक्ता
क्या बात
हृद्य आठवण!
शब्दच नाहीत
धारवाडी पेढाच ....
छान
छान
काय
अतिशय
+१
In reply to अतिशय by इंटरनेटस्नेही
क्या बात है !
आशा भोसले
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंद्याशेठ,
In reply to आशा भोसले by नंदन
धन्यवाद हो
In reply to आशा भोसले by नंदन
छान आठवण सांगितलीत तात्या...!
छान
भेट दोन
काय
>>काय
In reply to काय by Pain
समयोचित..
खुप छान
धन्यवाद