Skip to main content

कला

बेबी क्लोथ थीम केक

चेरी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले. जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते.

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

चित्रगुप्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव.

पाईनॅपल टेबल रनर

जयवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :) नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :) हे मूळ चित्र नेटवरचं. TR आणि हे मी केलेलं. TR1 TR2 TR$

केकचे फोटो

चेरी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
नमस्कार मिपाकर, मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे. चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो.

जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता.... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ.कुमार विश्वास. गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा.

हादडाया दाही डिश्या

बॅटमॅन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती. निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय?

चित्र-रंगावली प्रदर्शन

अत्रुप्त आत्मा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
श्री.जगदीश चव्हाण सर, चित्र रंगावली आणी इतर सर्व प्रकारच्या रांगोळ्यां मधिल एक मोठ्ठं नाव...माझी यांची ओळख आमचा १ व्यवसाय-मित्र,जो त्यांचा विद्यार्थी आहे,त्याच्यामुळे झाली.गेल्या वर्षी पहिल्यांदा मी सरांच्या आणी त्यांच्या शिष्यवर्गाने काढलेल्या उत्तमोत्तम रांगोळ्या पाहिल्या आणी मन भारावुन गेलं आमचा मित्र त्याच प्रदर्शनात माझीपण १ फुलांची रांगोळी व्हावी म्हणुन म्हणाला होता आणी गेल्या वर्षी मी कामांच्या फुल्ली लोडेड सिझनमधे जेव्हढा वेळ मिळेल त्यात जमेल तशी रांगोळी काढली पण होती.या वर्षी मात्र चव्हाण सरांनी सुमारे महिनाभर आधी मला अवर्जून प्रदर्शनाची तारिख/वेळ इ.सर्व काही सांगितलं आणी,''तुंम्ही फु

वेलीचा स्कार्फ आणि बटवा

जयवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
हे नाजुक आणि सुरेख डिझाईन मला मिळालं पिंटरेस्ट.कॉम वर. अनायसे हिरवा दोरा होताच.......लगेच करायला घेतला. दोरा बारीक असल्यामुळे थोडा वेळ लागला. पण झाल्यावर खूप समाधान सुद्धा मिळालं :) scarf आणि हा बटवा Scarf2

कधी वाटतं..

विसोबा खेचर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
कधी वाटतं.. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं.. तर कधी वाटतं... भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या.. कधी वाटतं.. बाबूजींच्या पायाशी बसून 'झाला महार पंढरीनाथ..' किंवा 'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं.. तर कधी वाटतं.. थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं.. आणि तिच्या पायांना मिठी मारावी.. कधी वाटतं... हळूच, पावलांचा आवाज न करता कलाश्री बंगल्यात शिरावं... आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला पुरिया कानी पडावा.. वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन चुपचाप