आला वर्दी - एक अवलिया.
कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे.
अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी.
मिसळपाव
