Skip to main content

बेबी क्लोथ थीम केक

लेखक चेरी यांनी सोमवार, 27/05/2013 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले. जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले. . . . . . शूजचा आकार रहावा त्यासाठी तुम्ही प्लास्टीक/टिश्यू पेपर वापरु शकता, वाळल्यावर काढून टाकायचे. . .
लेखनविषय:

वाचने 22317
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

हे सगळं घरी बनवलय तुम्ही??? २ बाळं असताना...??? आणि त्यातलं एक वर्षाचं असताना??? कशाला हो आम्हाला लाजवायला असे धागे काढता??

अतिशय सुंदर. रंगसंगती छानच आहे. खुपदा ह्यात गडद (भडक) रंग वापरण्यात येतात. पण हे रंग नयनरम्य, सुखावह आहेत. काजूपेस्ट वापरली आहे का? पाककृती सुद्धा टाका की!

हे सर्व मी फॉनड्ण्ट वापरुन बनवले आहेत. मला शिकवायला नक्कीच आवडेल. फॉनड्ण्ट घरी बनवू शकता/ विकत मिळतो इकडे विल्ट्न कंपनीचा, मी तो आणला. पाढंरा रंग आणून त्यात हवे ते खायचे रंग मिसळायचे, हलक्या छटेपासून मग गडद करायचे नाही तर खूप गडद होतात थोडावेळ मुरले की. समजा असे झालेच तर थोडे पांढरे फॉनण्ड्ट मिसळा. शूज साठी- आवडत्या रंगाचे फॉनण्ड्ट लाटून घ्या, खूप पातळ पण नको आणि जाड पण नको. पातळ असेल तर आकार राहणार नाही. फोटोवरुन अंदाज येईल. टेंप्लेट वापरुन शूजचा बेस आणि वरचा भाग कापून घ्या, लहान सुरी/ त्याचे निराळे टूल्स मिळतात. असे दोन संच कापा. थोडेसे पाणी दोन्ही तळ व वरच्या भागाच्या कडांना लावून चिकटवा व जास्तीचा वरचा भाग सावकाश कापा आणि वरील भागाची दोन्ही टोके पाणी लावून जुळवा. . . शूजचा आकार राहण्यासाठी प्लास्टीक/ टिश्यू पेपर वापरा , वाळल्यावर काढून टाका. आता बेल्टसाठी लहान पट्टी कापलेली पाणी लावून चिकटवा. . सजावट- शूजच्या रंगाला शोभणारा दुसरा रंगाचा फॉनड्ण्ट थोडा पातळ लाटून बारिक पट्ट्या कापा व शूजच्या तळ व वरचा भाग जिथे जोडला आहे तिथे पाणी वापरुन लावा. कुकी कटरने फुलांचे आकार कापुन चिटकवा, बेल्ट वर छोटे डॉटस लावा. आशा करते की मी, समजेल असे लिहीले आहे.

मला सफारी वर दिसत आहेत्,पण दुसरीकडे नाही. जाण्कार मदत करु शकतील का? जर मूळ पोस्ट मध्ये बदल/ अ‍ॅड करायचे असल्यास कसे करावे?