Skip to main content

भक्ती (छायाचित्रे)

वेल्लाभट यांनी या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या गणपतीच्या वेळी 'भक्ती' या विषयावर आधारित काही छायाचित्रे टिपली होती. ती तुम्हा सर्वांस दाखवत आहे, प्रतिक्रीयांचे स्वागत ! 1 2 3 4 5 6 7
लेखनविषय:
पैसा

तुम्ही काढलेली छायाचित्रे छान आहेत पण धाग्याचे शीर्षक "भक्ती" ऐवजी "पूजा" बरोबर ठरले असते असे वाटते.
07/07/2013 - 09:53 Permalink
अत्रुप्त आत्मा

In reply to by अभ्या..

@पूजा मस्त नाव आहे. माझे पण अनुमोदन.>>> माझेपण...माझेपण...! ;) बालिका-भक्ति =)) भक्ति-मय बालिका :p
07/07/2013 - 15:56 Permalink
चित्रगुप्त

छान आहेत फोटो. एक प्रश्न विचारतो, की यातील प्रत्येक विषयाचे तुम्ही चार-पाच वेगवेगळ्या कोणातून्/उंचीवरून फोटो काढून मग त्यापैकी तुम्हाला उत्कॄष्ट वाटलेले फोटो इथे दिले आहेत का? उदाहरणार्थ समईचा वरून काढलेला फोटो, हा समईच्या ओळखीच्या प्रतिमेला (एक उभट, उंच वस्तू) छेद देऊन जणुकाय ती एक पंचकोणी (वा पंचटोकी) वाटी आहे, असा आभास करतो,तो मजेशीर वाटतो, आणि काहीतरी वेगळेपण त्यात वाटते.( समईच्या सावलीवरून कळते की ती उंच समई आहे, त्यामुळी चित्राला आणखीनच खुमारी येते). शेवटल्या माळेच्या फोटोत जवळचे मणी आणि कापडाची वीण वा पोत यातील स्पष्टता, आणि दूरचे मणी व कापड यांची धूसरता, यांच्यामधील विरोध, हा चित्राचा मुख्य विषय (वा आशय) गृहित धरून आणखी प्रयोग करता येतील. रुढ अँगलने काढलेल्या फोटोंपैकी शंखात ठेवलेल्या फुलाचा फोटो उल्लेखनीय वाटतो. गणपतीच्या मूर्तीचे सुध्हा अगदी वेगळ्या, अकल्पनीय, अश्या अँगलने फोटो काढण्यातून काही चमत्कृतीपूर्ण, अनवट अश्या प्रतिमा मिळण्याची शक्यता आहे... पुढील धाग्यातून असे काहीतरी प्रयोगात्मक बघायला मिळेल, अशी आशा करतो. शुभेच्छा. (तुमचा लोगो आणखी लहान करून दिसेल न दिसेल इतपत केल्यास आणखी बरे).
08/07/2013 - 10:35 Permalink
प्रभाकर पेठकर

In reply to by चित्रगुप्त

उदाहरणार्थ समईचा वरून काढलेला फोटो
ती 'समई' नसावी. ते निरांजन वाटते आहे. समईच्या वर पिसारा फुलवलेल्या मोराची प्रतिमा आहे.
08/07/2013 - 11:50 Permalink
वेल्लाभट

सगळ्यांचे आभार ! चित्रगुप्त: सूचनांचे स्वागत आहे. नमूद केले आहेत आपले सल्ले.
08/07/2013 - 21:55 Permalink