Skip to main content

कला

गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath

लेखक प्रास यांनी रविवार, 08/12/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच.

कथा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 03/12/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो.

युद्धाचे वादळ या पुस्तकाचे मुखपृष्ठ.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 23/11/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मी माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः तयार केले आहे. ( आपल्याला आठवत असेल यातील दोन पूर्ण प्रकरणे मी मिपावर टाकली होती एक होते ज्यूंच्या शिरकणाबद्दल आणि दुसरे एक होते. असो) आता मी पुस्तक पूर्ण केले आहे (८३० पाने). हे जे मी मुखपृष्ठ तयार केले आहे ते ठीक आहे का याबद्दल आपली प्रांजळ मते मागवीत आहे. जर तुम्हाला आवडले तर मी दुसरे कव्हर डिझाईन करणार नाही व माझा बराच वेळ वाचेल.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

भारतरत्न बिग टी अन बिग बी ....

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 16/11/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अख्रेर सचिन रमेश तेंडुलकर याना " भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मानाचा किताब जाहीर झाला आहे. हा सन्मान खरे तर क्रिडापटूना द्यावा का असा प्रथम प्रश्न होता. नंतर त्यात सांघिक खेळातील एखाद्याच खेळाडूला द्यावा की नाही असाही वाद होता. सचिन बरोबरच डॉ. राव यानाही ही हा सन्मान मिळत आहे. आपण दोघांचेही त्रिवार अभिनंदन करू या. बाकी सचिनच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की जे खेळ तो खेळत होता तो बारकाव्यांचा ( प्रिसिजनचा) खेळ आहे. १४० किमी ने येणार्‍या चेंडूला चार इंच रूंदीच्या बॅटने सुमारे ९ इंच रूंदीचा यष्टी पट सुरक्षित ठेवायचा.म्हणजे दरवेळी चार इंचाची वाट चेंडूला मिळण्याची शक्यता जवळ जवळ १०० टक्के.

फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 16/11/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुलछडी-
या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो...

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 09/11/2013 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मालिकेचे नाव : महाभारत निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * ) संगीत दर्जा : उत्तम ( * * * * ) पुनर्प्रसारणाबद्दल : सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

तुझपे दिल कुरबान

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 24/10/2013 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझपे दिल कुरबान भारतीय फिल्म संगीतातील गायनाचार्य माननीय श्री मन्ना डे यांचे गुरूवारी दु:खद निधन झाले. या काळातील समर्थ , शैलीदार गायकांच्या रत्नहारातील एक रत्न आज गळून पडले. उत्पती, वधेन व लय या चक्रातून सर्व चराचराना जावे लागते हे जरी खरे असले तरी काही जण आपला एक खास ठसा जनमानसावर व इतिहासावर उमटवितात. मन्ना डे हे नाव गेली साठ सत्तर वर्षे संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले होते.