Skip to main content

कला

द सिंपसन्स : वेगळेपणातले वेगळेपण

लेखक पिंपातला उंदीर यांनी गुरुवार, 20/12/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्‍या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्‍या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्‍या एका परिवाराभोवती फिरते.

आवडती जाहिरात

लेखक समयांत यांनी गुरुवार, 20/12/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो. त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं.

टाकाऊतून टिकाऊ

लेखक त्रिवेणी यांनी बुधवार, 19/12/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.

जपानी कलात्मकता

लेखक neeta यांनी मंगळवार, 18/12/2012 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी लोक कलात्मकता (creativity) साटी प्रसिध्द आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी कला असतेच, आपण त्याच्याकडे लक्श देत नाही , संलग्न केलेले फोटो पाहून तुम्हाला देखील काही नवीन युक्त्या सुचतील ज्या तुमच्या घरासाठी धंद्यासाठी उपयोगी पड्तील.

माझ्या घरची बाग

लेखक neeta यांनी मंगळवार, 18/12/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांची आवड तर बहुतेकांनाच असते पण ती लावायला कधी जागा नसते, तर कधी त्यांची जोपासना करायला वेळ नसतो. मुंबईत तर ग्रिल मध्ये, बालकनी असेल तर त्यात झाडं लावून लोकं आपली आवड जोपासतात. मग जर आपण शोभेच्या झाडांबरोबर भाज्या, मसाले (मिरच्या कोथिंबीर पुदीना, पाती चहा) लावले तर आपल्याला घरच्या घरी ते मिळतील. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघावा. त्यासाठी काही जास्त पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही बाजारातून कधी पुदीना आणलात त्याच्या काड्या फेकून न देता त्या मातीत खोचून ठेवा. तुम्हाला भरपूर पुदीना मिळेल. कढीपत्ता पण कोणाकडून रोप आणून लावू शकता.

पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

लेखक neeta यांनी सोमवार, 17/12/2012 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.

(चावडीवरच्या गप्पा - अभिजात संगीतोत्सव)

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 16/12/2012 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
(सोत्री यांची क्षमा मागून). "उस्तादजींनी म्हणे कहर केला मैफिलीत, आणि त्या झिपर्‍या, स्मार्ट तबलजीशी जोरदार जुगलबंदी झाली त्यांची. पूर्वी मिथुनदांना गरिबांचा अमिताभ म्हणायचे, तसा गरिबांचा झाकिर हुसेनच म्हणायला हवा या तबलजीला.", चिंतोपंत जगप्रसिद्ध 'खिडकी वड्याच्या' स्टॉलजवळची नुकताच नजरेत भरलेला सौंदर्यफुफाटा नीट न्याहाळता येईल अशी जागा पकडत. "आजकाल काही राम राहिला नाही या मोठमोठ्या उस्तादांच्या आणि पंडितजींच्या मैफिलीत. असल्या वादनाला 'अभिजात' का म्हणायचे ते त्या शारदांबेलाच ठाउक. एक ना धड भाराभर चिंध्या.

काटो सें खीच के ये आचल ...

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 11/12/2012 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुसुमाग्रज म्हणाले होते- सर्वात सुंदर आवाज कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळ्ळकन तुटल्याचा
देव आनंद हा किमान चार पिढ्यांचा लाडका चॉकलेट हीरो. राज व दिलीप ह्या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही. त्या काळातील नायिका जे करीत, किंबहुना कोणत्याही काळातील हिंदी चित्रपटाच्या नायिका जे करतात, ते त्याने नायक म्हणून केले. उदा. –छान छान कपडे घालून स्टाइलिश दिसणे व बागेत, डोंगरदऱ्या त गाणे म्हणत नाचणे. त्याने गंभीर भूमिकांना फारसा हात घातला नाही. त्याला विनोदाचे अंग नव्हते. वीर व करुण हे हिंदी चित्रपटातील महत्त्वाचे रस.

गाल चोळ फक्त

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 11/12/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,