Skip to main content

योगायोगाने झालेली कलाकृती

लेखक sanjivanik१ यांनी शनिवार, 26/10/2013 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
चहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार a
लेखनविषय:

वाचने 93191
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

खतरा ४४० व्होल्टस ची खूण आली तर चहात साखर जास्त पडली आहे व उद्या शुगर २२० फास्टिंगयेणार आहे असे समजायचे का ?

अतिशय सुरेख. आता पर्यंत कलादालनात असंख्य कलाकृती बघितल्यात. पण यासम हीच. याची सर इतर कुठल्याही कलाकृतीला येणे शक्य नाही.

इतकी सुंदर कलाकृती चहा गाळताना योगायोगाने गाळणीत तयार व्हावी हा एक उत्तम योगायोगच आहे. देवाची करणी आणि गाळणीत बदामाची निशाणी.

In reply to by प्रचेतस

@आणि त्या गाळणीचा रंगही लाल आहे हा अजून एक योगायोग.>>> =)) __/\__ =)) आत्मू'ज साक्षात्कार- गाळणिच्या धाग्याची चाळणि होणार! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मू'ज साक्षात्कार- गाळणिच्या धाग्याची चाळणि होणार!
इतकंच नव्हे तर एखादा प्रत्ययदर्शी कवी "चहाला जाऊन गाळणी का लपविता?" असं एखादं सुंदर काव्यही लिहिल.

In reply to by धन्या

आयला नेमकं हेच म्हण्णार होतो, प्रतिसाद टायपू असा विच्यार करेपर्यंत हा प्रतिसाद पाहिला =)) =)) =)) (चहाला जाऊन) गाळणी का लपविता? नकळत उतू गेला चहा पातेल्यावरुन सांडला तू चहा गाळायची गाळणी झालिस हा कावा मलाच कसा नाही कळला??? गाळणीमध्ये घट्ट गाळ ,खरडा खरडीनेच निघत आहे.. चमच्याने कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. चहाचा पूर्वार्ध वाटेल,साईत पहा जमलम.. पावडर उत्तरार्धात बसेल, वरती साय तरंगम... यदाकदाचित माझ्या चहाला ,प्रथम तु म्हणशील गाळ की, साय किती रे ही... पण मी तुला चहा पाजून,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''

In reply to by बॅटमॅन

aaa नकळत चहा उतू गेला ग बयें चहा पातेल्यावरूनी सांडितसे ग मायें होवोनिया गाळणी तू भांडीयाची कैसे मज उमगेल हा कावाची खरडा खरडोनीची निघतसे गाळ गाळणीयातूनी पळी वापरोनी सत्वरी निघतसे पहा कसे मौजेनी पहिल्यासी जमतसे ही सायची परी समापणी बसोनी पत्ती ही साय तरंगे वरी ढोसूनिया हे पेय जरी गाळूनीया साय जरी ही पाजूनिया तुज हे अमृततुल्य हसोनी मी ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''

In reply to by प्रचेतस

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) निव्वळ _/\_ एक गाळणी द्या मज आणुनि गाळीन मी जीत स्वप्राणाने भेदुनि टाकिन भांडी सगळी मोठ्या चहाच्या उष्णतेने अकस्माच्चायपेयं तद् पात्रात् वै बहिरागतम् | अभवत्कथमेतत्तु नावगच्छमहं खलु || अदृष्टपूर्वमेतच्च दृष्ट्वा हि मुदितोऽस्म्यहम् | कथं शोधयसि चायं दर्शनीयं नु तत् खलु || शोधन्यौ वै कणा: सर्वे दृढत्वेन ह्यवस्थिता: दर्व्या लघुप्रयत्नेन निष्कासिता तु सत्वरम् || दृश्यं तच्छोभनीयं हि अनंगस्मरणप्रदम् | यथा दर्वी प्रयतते, स्मरकेलीव दृश्यते || चायपेये पयसारं तुभ्यं यद्यपि बाधते | तथापि प्राशयित्वा त्वां "हिह्ही हिह्ही" हसाम्यहम् ||

In reply to by बॅटमॅन

एक गाळणी द्या मज आणुनि गाळीन मी जीत स्वप्राणाने भेदुनि टाकिन भांडी सगळी मोठ्या चहाच्या उष्णतेने =)) -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

"च्या"आईला . . . वल्ली आणि ब्याट्या . पोट फाडशिला हसवून हसवून =)) =)) =)) =))

In reply to by मुक्त विहारि

कॉपीराईट नाही हो काका. वॉटरमार्क म्हणतात त्याला. एखादी अभिजात कलाकृती असेल तर ती कलाकृती आंतरजालावर शेअर झाल्यावर त्या कलाकाराचे नाव कळण्यासाठी वॉटरमार्क टाकला जातो.

In reply to by धन्या

मग तो "गोलातला सी" म्हणजे कॉपी राईटच ना? असो एकूण काय, तर हा असा एक्मेकाद्वितीय फोटोची कॉपी कुण्णी क्ण्णी करु नये म्हणून घेतलेली काळजी आहे ती असे वाटत आहे.

In reply to by धन्या

फार अभ्यास करतोय मी ह्या फोटोचा.... आत्ता आत्ता कुठे एक एक पैलू उलगडायला लागले आहेत.

In reply to by मुक्त विहारि

आत्ता आत्ता कुठे एक एक पैलू उलगडायला लागले आहेत.
मला तर आता गाळणीचा नायलॉनचा एक एक धागा उसवणार असेच दिसत आहे.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि यांस , माझा फोटो चा तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो हे वाचून चांगल वाटलं . त्याचे तुम्हाला उलगडणारे पैलू मला पण वाचायला आवडतिल. कायदेशीर रित्या कुठे अर्ज केला नाही साठी अजून , पण नाव देण्याची पद्धत म्हणून नाव दिले आहे. आणि आपल्या फोटो वर copyright घेण तस चुकीच नाही , नाही का?

In reply to by धन्या

मूविंचं तेच म्हणणं आहे धन्याशेठ. वाटरमार्क टाकून त्यांनी त्यांच्या गाळणीचा कापीराईट सुरक्षित करून घेतलाय.

In reply to by प्रचेतस

ह्या वॉटर मार्क ने नक्की गाळणी कॉपीराईट झाली की हा फोटो की दुध सदृश चहा की बदामाचा आकार ?

In reply to by प्रसाद गोडबोले

गिरीजा यास, मी पण आता पुरती गोंधळून गेले आहे. त्या फोटो पेक्षा पण त्या गोलातल्या c नेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

१. गाळणीचा लाल रंग (हा कामगार वर्गा बाबत काही तरी सांगत आहे.) २. खालील अ‍ॅल्युमिनियमचे भांडे (हा गरीबीबाबत काही तरी सांगत आहे.) ३. चहा थोडा दिसत आहे.कारण भांड्यात ओतलेला चहा गाळणीला चिकटलेला नाही. ४. चा पत्ती दिसत नाही.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारी यास, चहा ओतलेलाच नाही , फक्त दूधच गळून घेतले आहे. बाकी माझ्या फोटोचे असे हि पैलू निघतील याची कल्पना नव्हति. काचेच्या , मातीच्या भांड्याचे आमच्याकडे वावडे आहे त्यांच्या नाजूक पणा मुळे त्यामुळे स्टील जिंदाबाद.

In reply to by sanjivanik१

खालील पाँटस नोटेड १. चहा ओतलेला २. दुधच गाळून घेतले आहे. ३. स्टीलचे भांडे वापरले आहे. असे तुम्ही म्हणता, पण भांडे स्टीलचे नसून अ‍ॅल्युमिनियमचे किंवा गेला बाजार हिंडालियमचे असावे, असे फोटो दाखवतो. (मातीचे नाही, हे फोटोत पण दिसते आहेच.)

In reply to by मुक्त विहारि

ते भांडे स्टीलचेच असण्याची शक्यता असून नीट घासलेले नसल्याने चमकत नसावे.

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही फक्त चित्रंच पाहता असं दिसतंय. त्यांनी स्पष्ट लिहिलंय की:
चहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार
आणि तुम्ही विचारताय दुध का गाळून घेतलं.

In reply to by धन्या

कारण मध्येच थोडेसे काहीतरी धुरकट-पांढरट काहीतरी दिसत आहे.

In reply to by धन्या

अहो चित्रच इतक्या अत्त्युच्च दर्जाचे आहे म्हट ल्यावर शब्दांकडे लक्ष तरी कसे जाईल?

In reply to by प्रसाद गोडबोले

मी ह्या द्रुष्टीने विचार नाही केला. मी आपला चहाच गाळला असेल, असे समजत होतो. दूध जर गाळून घेतले असेल तर.... मिल्क पावडर पासून दूध बनवले असेल का? आणि मिल्क पावडर अस्लीच तर कुठली? नेस्ले की एव्हरेडी की अमुल? का परदेशातील कुठली तरी?

कायतर चहापूडीची भुकटी बघून भविष्य सांगतात त्याची आठवण झाली. रच्याकने जुन्या रुमालाचा धुण्याआधी एक्स रे काढावा म्हणतोय, काय दिसते पाहू.

In reply to by अत्रुप्त आत्मा

भिंतीला गाळणीची काय सर........ कुठे ती गाळणीवरची निशाणी आणि कुठे तुमची भिंतीवरची पिपाणी.

In reply to by धन्या

साला एक मच्छर आदमी को अतृप्त आत्मा बना देता है

In reply to by प्रसाद गोडबोले

साली एक प्रतिक्रिया, इन्सान को गिरी जा बना देती है। :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

साडेचार कोटी वर्षांपूर्वीचा डास सापडला. http://www.livescience.com/40402-fossil-mosquito-blood-meal.html

In reply to by लौंगी मिरची

चहाच्या वरची तरी गाळणी च आहे,कश्यावरुन? ;-)

In reply to by धन्या

अहो तुंम्हास कळत नाही काय? जे नसत,तेच अधिक स्पष्ट दिसल पाहीजे! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

म्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या विषयावरची कथा एकदम भंकस आणि भंगार कथाविषय असलेली कथा वाटावी तशी?

In reply to by मुक्त विहारि

मुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व "अभ्यासकांचे" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )

In reply to by मुक्त विहारि

ओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक या गाळणीवर, गाळणीतल्या ह्रदयसदृश आकारावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉपीराइटवाल्या फोटोवर.!

आजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .

ए काय थट्टा लावलीये रे या धाग्याची? लिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता
"If you look upon an old wall covered with dirt, or the odd appearance of some streaked stones, you may discover several things like landscapes, battles, clouds, uncommon attitudes, humorous faces, draperies, etc. Out of this confused mass of objects, the mind will be furnished with an abundance of designs and subjects perfectly new."
http://www.tate.org.uk/context-comment/articles/deliberate-accident-art नवीन लेखिका आपणहून गाळण्याकडे पहातीय आणि तुम्ही राव थट्टा लावलीय...

गाळीव रत्नांच्या गाळीव प्रतिक्रिया वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली वगैरे वगैरे. नवीन लेखकांना असे रॅगिंग करता काय कंपूबाजांनो?

In reply to by पैसा

संजिवनी के हां तुमचा डु आयडी आहे काय? आताच प्रशांतला सांगतो आयपी चेक करायला. ;)

In reply to by प्रचेतस

प्रशांत माझ्या कंपूत आहे. संजीवनीके१ हा वल्लीचा डुप्लिकेट आयडी आहे असं नक्की सांगेल तो.