मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझपे दिल कुरबान

चौकटराजा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तुझपे दिल कुरबान भारतीय फिल्म संगीतातील गायनाचार्य माननीय श्री मन्ना डे यांचे गुरूवारी दु:खद निधन झाले. या काळातील समर्थ , शैलीदार गायकांच्या रत्नहारातील एक रत्न आज गळून पडले. उत्पती, वधेन व लय या चक्रातून सर्व चराचराना जावे लागते हे जरी खरे असले तरी काही जण आपला एक खास ठसा जनमानसावर व इतिहासावर उमटवितात. मन्ना डे हे नाव गेली साठ सत्तर वर्षे संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनून राहिले होते. खास करून ज्या रसिकाना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची थोडीफार आस आहे ,जाण आहे त्याना तर मन्ना दां चे निर्वाण हा आपला नातेवाईक गेल्याचे दु:खाचा अनुभव देणारे असणार आहे. १९४३ पासून सतत गायन करणार्‍या मन्ना डे यानी. ३५०० चे वर गीते गायली आहेत. त्यात शास्त्रीय संगीतावर आधारलेली, विनोदी शैलीची, प्रेमगीते, देशभक्तीपर गीते, कव्वाल्या, या सर्व प्रकारच्या गीतांचा समावेश आहे. हिन्दीप्रमाणेच मराठी तही. अ आ आई म म मका, प्रीत रंगली गं, मन माझे सजणी तुजवर जडे, मज लोटू नको गे दूर हे माते भारत भूमी, नम्बर फिफटी फोर,रघुकुल दीपक येता द्वारी, घन घन माला नभी दाटल्या, ई अनेक गीते त्यानी गाउन आपल्या सारख्या रसिकाना आनंद दिलेला आहे. विविध गान प्रकारांचा निकष धरता खालील गीतांचा आठवण ही मन्ना दा ना आदरांजली ठरावी. १) पूछो न कैसे मैने रैन बितायी ( आर्तता ) २)तू प्यारका सागर है ( भक्ति) ३)जननी जन्म भूमी स्वर्गसे महान है ( देश भक्ति) ४)चलत मुसाफिर ( लोकगीत ) ५)ये रात भीगी भीगी ( युगल गीत) ६)जोडी हम्मारी जमेगा कैसे जानी ( विनोदी युगल गीत ) ७)कस्मे वादे प्यार वफा सब ( निराशा गीत ) ८)लागा चनरीमे दाग ( शास्त्रीय संगीत) ९) ऐ मेरे जोहरा जबीं ( कवाली ) १०)केतकी गुलाब जुही ( शास्त्रीय जुगलबंदी ) मन्ना दा , आपल्या स्मृतीला अभिवादन !

वाचने 5118 वाचनखूण प्रतिक्रिया 26

ये शोखियां ये बांकपन जो तुझमे है, कहीं नही दिलोंको जितनेका फन जो तुझमे है, कहीं नही मैं तेरी.., मैं तेरी.., आखोंमे पा गया दो जहां ऐ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही तू अभितक है हंसि और मैं जवां.. तुझपे कुरबान मेरी जान, मेरी जान! मन्ना दा, हे गाणं प्रत्येक सखा ज्या ज्या वेळी त्याच्या सखीसाठी म्हणेल त्या त्या वेळी तुम्ही पुन्हा पुन्हा व्यक्त व्हाल. द मेलडी नेव्हर डाईज, इट जस्ट एक्स्प्रेसेस इटसेल्फ इन अ न्यू फॉर्म.... मन्ना दा यू विल कीप सिंगींग फ्रॉम एवरी यंग हार्ट... ऑलवेज अँड ऑल द टाईम!

योगी९०० 24/10/2013 - 10:44
मन्नादांना श्रद्धांजली.. आजच सकाळी पडोसन मधले "सावरीया आओ.." ऐकत होतो तेव्हा मनात विचार पण आला नाही की आज ही बातमी कळेल...

किसन शिंदे 24/10/2013 - 11:03
यांची लागा चुनरी में दाग आणि छनक छनक तोरी बाजे पायलिया हि दोन्ही गाणी अंत्यत आवडती. पंडीत भीमसेन जोंशीसोबत गायलेलं केतकी गुलाब जुही चंपक बन फुले हे गाणंही अंत्यत श्रवणीय! मन्ना डे यांना विनम्र श्रध्दांजली..!

असंख्य, अगणित सुप्रसिद्ध गाण्यांची मेजवानी देणारा सुमधूर आणि सर्वपट्टीत गाणारा स्वर्गिय आवाज अनंतात विलीन झाला. फार फार दु:खद बातमी.

तिमा 24/10/2013 - 13:09
ते माणूस म्हणूनही फार थोर होते. त्याची अनेक गाणी आवडीची आहेत, पण आत्ता आठवतं आहे ते 'सूर ना सजे क्या गाऊं मैं' जुन्या जमान्यातला शेवटचा महान गायकही काळाच्या पडद्याआड गेला.

चित्रगुप्त 24/10/2013 - 19:19
मन्नाडे यांना श्रद्धांजली. चौरासाहेब, तुम्ही मन्नाडे यांच्या जीवनाबद्दल (आणि गायनशैली बद्दलही) आणखी विस्तृतपणे लिहा ना. त्यांची गाणी ऐकली आहेतच, पण अन्य काही माहिती नाही. कोणकोणत्या संगीतकारांकडे ते कोणकोणती विशेष गाणी गायले, ओपी-मन्नाडे अशी गाणी आहेत का? मंगेशकर भगिनी सोडून अन्य कोणत्या गायिकांबरोबर त्यांची युगल गीते आहेत? त्यांचा खास काळ (ज्यात त्यांची सर्वोत्कृष्ट गाणी निर्माण झाली तो) कोणता ?

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 24/10/2013 - 19:52
नय्यर साहेबांकडे ते फक्त पाचेक गाणी गायले. तीन रफी बरोब्रर एक आशा बाईंबरोबर .पण गाजले एकच तू है मेरा प्रेम देवता हे राग ललत वर आधारलेले .