लेखनप्रकार
कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे.
अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी. जगभरातलं विविध प्रकारचं संगीत ऐकून नवनवीन धुन बनवणं हा त्याचा छंद आहे. २०११ मध्ये यूट्यूबवर वर्दी आणि आणखी ४ संगीतप्रेमींचा हयाजान (Hayajan) हा अरेबिक रॉक बॅंड त्यांनी सुरू केला, आणि तो अल्पावधीतच बराच लोकप्रियसुद्धा झाला.
स्वत: उत्कृष्ट गायक, सिन्थेसायझर आणि गिटार वादक असणा-या वर्दीला भारतीय संगीताबद्दल विलक्षण प्रेम आहे. त्यातही ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी संगीतकार नदीम श्रवण, ए.आर.रहमान आणि आमीर खान यांचा हा प्रचंड चाहता आहे. संगीतात नवीन प्रयोग करण्याची इच्छा असणा-या वर्दीने कुठलंही वाद्य न वापरता केवळ हात, शरीरावर दिलेला ठेका आणि आवाजाचा वापर करून पहला नशा हे गाणं बनवलं.
http://www.youtube.com/watch?v=c1GNDPXDYdY
त्यानंतर त्याने जब तक है जान मधलं जिया रे हे गाणं बनवलं.
http://www.youtube.com/watch?v=oVlCE_Ft0hc
नुकतंच अमेरिकन पॉप गायक पीटर हॉलन्स सोबत त्याने स्लमडॉग मिलीनेयर मधलं जय हो हे गाणंसुद्धा अशाच पद्धतीने बनवलंय.
http://www.youtube.com/watch?v=ln41c-7uQ64
अशा अवलिया आला वर्दीची हयाजान मधली सगळी गाणी यूट्यूबवर आहेत. शिवाय www.alaawardi.com या त्याच्या संकेतस्थळावरून डाऊनलोडसुद्धा करता येतात.
मिसळपाव
अतिशय श्रवणीय आहे हे संगीत.
In reply to अतिशय श्रवणीय आहे हे संगीत. by स्पंदना
त्याच्या संकेतस्थळावरून
हा पण लेक मस्तच.... पण...
In reply to हा पण लेक मस्तच.... पण... by मुक्त विहारि
होय.
मस्तच
खुप मस्त...
आला वर्दी सुरेखच गातो...
मस्तच!!!
लैच्च भारी...
व्हेरी व्हेरी ठांकू!
कुल!
सुंदर..
अप्रतिम!
मस्तच!
मला वाटलं नवाब आला वर्दीबद्दल