Skip to main content

हे ठिकाण

कंटाळा.....

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आला आहे यार! कंटाळा आला आहे यार! तोच तोच गंजलेला किनारा त्याच बोथट पावसाच्या धारा आणि जोडीला नेभळट वारा चार दिशांचा पिंजरा आणि आभाळाचं ओझं नकोय हे सगळं... एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! दुःखाचा गुडघाभर चिखल सोबत विचारांचं जंगल शंकांच्या वावटळी अज्ञाताचा ताण आणि तत्वांची हेळसांड! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! जुन्या विचारांचा बुजबुजाट पोथीवादाची रटरट आणि कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार! मूर्खांचा सुळसुळाट भीतिची जळमटं! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! झाडाला फ़ुलं येतात पण झाड बहरत नाही समुद्र रोज खवळतो पण त्यात गांभिर्य नाही, उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा चंद्र-

एक दिवस.....

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी बघितला काय, अन तुला दिसला काय. इथून तिथून कुठुनही आकाशात दिसणारा तो चंद्र एकच. तरी.................. कधी प्रतिप्रदेचा, कधी चतुर्थीचा, कधी अष्टमीचा, तर, कधी पौर्णिमेचा. हसत हसवत खुलणारा! कुणाचा चांदो मामा. कुणासाठी तिचा चेहरा. कधी यशाचा, कधी भाकरीचा, कधी शीतल साथी, सुख दु:खांचा साक्षी. तो सगळ्यांचा!!......... आणि त्याचा? तसं सार जगही त्याचंच!! पण एक दिवस..... फक्त एक दिवस! तो फक्त त्याचा असतो. पूर्ण जगाकडे पाठ फिरवून, दूर एकांतात जाऊन बसतो. त्या दिवशी केवल त्या दिवशी!! तो सुर्याला भेटतो स्वत:साठी जगतो. आणि आपण [अमा वस्येच्या] दिवसाला 'अवस, अवस' म्हणत चुकचुकत बसतो. चंद्राच्या आनंद

एक मैत्रिण

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा.. एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर.. एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.. एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्री

न्यूनगंड

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 22/02/2008 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग... लेखक एकटे राहणार्‍या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात. लेखक विचारतो, "अरे हे काय?" तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात" त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो.

मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्‍हाणे)

लेखक इनोबा म्हणे यांनी शुक्रवार, 22/02/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
"डोक्यावर सोनेरी मुकूट मात्र अंगावर फाटकी वस्त्रे" अशी दयनीय अवस्था झालेल्या मराठीच्या समृद्धीसाठी झटणारे कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.या संस्थेच्या वतीने मराठी दिनाचे दिवशी - बुधवार दि. २७ फेब्रूवारी रोजी दूपारी १ वा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्‍हाणे घालण्यात येणार आहे.

श्रीमंतयोगी..

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 19/02/2008 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव परिवाराचा शिवरायांना मानाचा मुजरा...

झटपट न्याहारी

लेखक सृष्टीलावण्या यांनी सोमवार, 18/02/2008 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
दही बटर घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे. मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित् मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा. दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार.
Taxonomy upgrade extras