Skip to main content

हे ठिकाण

सारण की पुरण??

लेखक धनाधीश यांनी रविवार, 09/03/2008 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.
Taxonomy upgrade extras

प्रेशर कुकर पाककृती

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 07/03/2008 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेशर कुकर पाककृती येथे प्रेशर कुकरचा उपयोग करून तयार करता येणार्‍या शाकाहारी / मांसाहारी पाककृती द्याव्यात. उदा. भात, पुलाव, इडली, केक, हलवा, वरण, पुरण, चिकन इत्यादी. बर्‍याचशा मंडळी ज्या कामानिमित्त बाहेर रहातात, सगळ्यांकडेच काही microwave असतोच असे नाही. पण कुकर बहुतेकांकडे असतो. तो सहज बाजारात उपलब्ध आणि स्वस्त देखील असतो. काहींना भात करणे किती कमी खर्चिक आणि सोपे असते हे देखील माहिती नसते. म्हणून आपल्याकडे जर काही अशा पाककृती असतील तर त्यांची इथे देवाणघेवाण करू! वाजवा तर मग शिट्टी.....!!!
Taxonomy upgrade extras

पावाच्या पांचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थांची पाककृती

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 25/02/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव डॉट कॉमचा सदस्य झाल्यापासून खाद्यसंस्कृतीबद्दल मला जास्तच आस्था वाटायला लागली आहे. त्यावर निर्माण होत असलेल्या अनमोल साहित्यात आपणही अल्पशी भर घालावी असे वाटल्यामुळे हा लेख लिहिला आहे. वेळ वाचवण्यासाठी 'गागरमें सागर' म्हणतात ना तसे पांचशे पंचावन्न पदार्थ एका पोटळीत बांधून सादर करायचे ठरवले आहे.

Taxonomy upgrade extras

मैत्री असावी .........

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
रातोरात रडवणारी आसवाणी भीजवणारी हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री मैत्री आकाराने लहान पण अर्थाने मात्र महान असते रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण मैत्रीत असते भावनांची जान मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल मैत्रीत असतो मनमनाचा समतोल मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

कंटाळा.....

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आला आहे यार! कंटाळा आला आहे यार! तोच तोच गंजलेला किनारा त्याच बोथट पावसाच्या धारा आणि जोडीला नेभळट वारा चार दिशांचा पिंजरा आणि आभाळाचं ओझं नकोय हे सगळं... एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! दुःखाचा गुडघाभर चिखल सोबत विचारांचं जंगल शंकांच्या वावटळी अज्ञाताचा ताण आणि तत्वांची हेळसांड! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! जुन्या विचारांचा बुजबुजाट पोथीवादाची रटरट आणि कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार! मूर्खांचा सुळसुळाट भीतिची जळमटं! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! झाडाला फ़ुलं येतात पण झाड बहरत नाही समुद्र रोज खवळतो पण त्यात गांभिर्य नाही, उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा चंद्र-