शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग...
लेखक एकटे राहणार्या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात.
लेखक विचारतो, "अरे हे काय?"
तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात"
त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो. पलंगावर घालतो आणि मस्तपैकी आडवा होऊन म्हणतो, "हे असे."
हे पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली तरी तो लेख अजुनही मला लक्षात आहे कारण मी स्वत:
पसारा-भक्त आहे. मला पसार्यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.
माझे टापटीप नातेवाईक आले आणि त्यांनी स्वच्छतेवर व्याख्यान दिले की मला न्यूनगंड की काय म्हणतात तो छळतो पण तो फार काळ टिकत नाही. नातेवाईक गेल्यावर घटका-दोन घटका हा न्यूनगंड मला ग्रासतो. पुन्हा ये रे मागल्या...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8567
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पण पसारा भक्त
असेच
In reply to मी पण पसारा भक्त by लंबूटांग
सहमत!
मी सुद्धा..मी सुद्धा !!
थोडा चालतो
पसारा
" माय रूम.... लव्ह इट ओर लीव्ह इट"
आणखी एक पाटी
In reply to " माय रूम.... लव्ह इट ओर लीव्ह इट" by विजुभाऊ
बाथरुमवाली पाटी जामच आहे!
In reply to आणखी एक पाटी by मुक्तसुनीत
पसाराभक्ती
ऑर्डर
पसारा..
मी पसारा भरपूर केला तो
घरपण..
तात्या,
In reply to घरपण.. by विसोबा खेचर
आमच्या घरातील पसारा ...
जीवंतपणा
'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र
'ज्ञानेश्वर रद्दी-नारळ' केंद्र ...पुन्यात शनिवार पेठेत सकाळ च्या कोपर्यावर होते....महित नाही अजुन आहे का?
पण बर्याच रद्दी डेपोची नावे ज्ञानेश्वर रद्दी डेपो अशी का असतात ?
ज्ञानेश्वर आद्य मराठी साहित्यीक होते त्याचा असा सूड घेतला जाइल असे त्याना ही वाट्ले नसेल
ज्ञानेश्वर रद्दी डेपो
मला पसारा
पसारा खूपच आवडतो पण आवरायला !
कसला आलाय न्युनगंड?
पसाराप्रेमींसाठी
काय हा पसारा,