खच्चीकरणाची पंचवीस वर्षं.. म.टा.तील लेख.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख मनाला भिडला. ७९ साली जन्मलेल्या मला यातील काहीच कल्पना नव्हती. फक्त दत्ता सामंत यांच नाव कधितरी कानावर पडलं होतं. पण या लेखाने मन हेलावून गेलं.
डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला यावर्षीच्या १८ जानेवारीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो.
मिसळपाव