सूर्यास्त - २
माझ्यासारखेच अनेकांना सूर्यास्ताचे आकर्षण असल्याचे वाचून बरे वाटले.
खरे तर ही नेमाने दिवसागणीक घडत राहणारी घटना. पण तरीही सूर्यास्त कधीही कुठेही दिसला तरी नजर खिळवून ठेवतो. एखाद्या ठिकाणाहून निघता निघता पाय सूर्यास्तासाठी रेंगाळतो. कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेले तर एक सनसेट पॉईंट तिथे हमखास असतोच. तिथे जमणारी गर्दी, कलकल आणि टाकणे टाकायला वा ’आम्ही पाहीला हो सनसेट’ या सदरात मोडायला आलेल्या बहुसंख्य प्रजेची सूर्य बुडतो कधी आणि आपण आपले वाहन गाठतो कधी अशी घिसाडघाई यामुळे मी सहसा असे ’टोकाचे सूर्यास्त’ हमखास टाळतो.
अनेकदा ठरवून, आखून वा बेतून एखादी गोष्ट करण्यापेक्षा ती अनपेक्षित पणे घडुन येते तेव्हा अधिक मजा येते. सूर्यास्ताचे तसेच आहे.
अशाच एका प्रसंगी टिपलेला हा सूर्यास्त. मी फोशान हून बाईयून विमानतळाकडे निघालो होतो, जरा उशीरच झाला होता. मात्र तो लालबूंद सूर्य मला सोडवत नव्हता. वातावरण धूसर होते, शेवटपर्यंतचा सूर्यास्त काही बघता येणार नव्हता. शिवाय लवकरच विमानतळाचा परिसरही सुरू होणार होता. एकदा इमारती आल्या की आहे तेही दिसणार नव्हते. मगा चक्रधराला महामार्गाची वाहतूक सांभाळून गाडी क्षणभारासाठी बाजूला घ्यायला सांगितली आणि हे दृश्य टिपून मी निघालो. त्या ढगाळ आकाशात व धूसर वातावरणात तो लोखंडाचा रस ओतल्यागत सोनेरी लालबुंद सूर्यनारायण मला विलक्षण तेजस्वी दिसला.
सूर्यास्त प्रत्येक क्षणी, प्रत्येक कोनातून, प्रत्येक टप्प्यावर नवे रूप धारण करत असतो. पैचिंगचा ग्रीष्म प्रासाद पाहून परत निघालो. दिवस मावळायची वेळ झाली होती. सूर्य बर्यापैकी वर होता, पण हवेतल्या धूसरतेमुळे सौम्य भासत होता. अगदी सुरेख गोल अशी ज्योतच जणु मंदपणे आकाशात तेवत होती. अर्थात सहल सखीला याचे फारसे सोयर-सुतक नव्हते; बरोबरच आहे, तो तिचा रोजचाच उद्योग होता. मी मात्र तिच्या घाईला न जुमानती तिथेच रेंगाळलो. बाहेर पडायच्या वाटेवर उंच झाडे होती, काही इमारती होत्या आणि त्या सर्वातुन दिसणारा, लपाछपी खेळणारा सूर्यनारायण मला टिपायचा होता. एका वास्तूशी मी थबकलो. त्या वास्तूसमोरचे दोन बाजूचे दोन अगदी पार निष्पर्ण झालेले वृक्ष, त्या इमारच्या गच्चीची तटबंदी आणि वर दिसणारा सूर्य अप्रतिम दिसत होता.
तिथेच थोडे पुढे गेल्यावर त्यातल्याच एका वृक्षाच्या खाली झुकलेल्या फांदीच्या काटक्यांमधून दिसणारा सूर्य मी मुद्दामच किरण काट्क्यांवर साधत थोडा अस्पष्ट करून टिपला आणि त्या काटक्या जणु आपले सुटलेले तेजस्वी फूल पकडायला सरसावलेल्या दिसल्या
तिथून निघालो आणि पुढे एक महाकाय, अजस्त्र असा सहस्त्रबाहू वृक्ष आणि त्याच्यामागून प्रकाशणारा सूर्य यातून निर्माण झालेले हे काष्ठशिल्प दिसले.
आता मात्र निघायला हवे होते. अंधारु लागले होते, अधिकच लालबुंद झालेला सूर्य खाली येत होता. लवकरच तो दाट झाडीत गायब होणार होता. त्याचा निरोप घेण्यापूर्वी मी त्याला हिरव्या जाळीत शिरता शिरता टिपला आणि बाहेर पडलो.

वाचने
12760
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
क्लास!!
अप्रतिम
फर्माइश
साक्षीदेवा,
शब्दच नाहित..
सुंदर चित्रे , सुंदर लेख
चित्र २ वर विशेष प्रतिक्रिया
In reply to चित्र २ वर विशेष प्रतिक्रिया by धनंजय
सहमत आहे.
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
वा !!!
आणखी एक ..
In reply to आणखी एक .. by कोलबेर
वा!
In reply to वा! by विसोबा खेचर
+१
In reply to वा! by विसोबा खेचर
+१
In reply to आणखी एक .. by कोलबेर
अत्यंत सुंदर!
अप्रतिम सुर्यास्त...
In reply to अप्रतिम सुर्यास्त... by प्रभाकर पेठकर
मावळत्या दिनकराची चित्रे भन्नाट आहेत...
छायाचित्रकारांनो
काय सही
अहाहा... मजा
जबरदस्त
आणखी एक सुर्यास्त..
In reply to आणखी एक सुर्यास्त.. by कोलबेर
सुरेख..
उदास!
एकदम
वा
सर्वच छायाचित्रे अप्रतिम.