Skip to main content

हे ठिकाण

श्री. ओक सर ह्यांस वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

लेखक हैयो हैयैयो यांनी शनिवार, 31/07/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे.. ..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील! धन्यवाद! हैयो! हैयैयो!

एक सकाळ फळाफुलांची..

लेखक हेम यांनी शनिवार, 31/07/2010 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर माजो पयलो लिखान आसां... सायबानू! ..सांबालून घ्यावा.. ------------------------------------------------------------------------------ नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच.

(बट डोईवरि बट झुलते तरि)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 28/07/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच खरडवहीत डानरावांशी 'आधुनिक पुरुषांच्या केसांची निगा' या विषयावर चर्चा झडली. आपला केशसंभार कसा सांभाळावा, त्यासाठी कुठची उत्पादनं वापरावीत वगैरे खास पौरुषिण (स्त्रैण प्रमाणे) विषयांवर भाबडं हितगुज झालं. सध्याच्या पुरुषमनाची सुकुमार स्पंदनं त्यात प्रतीत झाली - कवितेला यापेक्षा अधिक राजस विषय तो कोणता मिळणार? मग आम्ही डॉनराव आपल्या केशकर्तन केंद्रात (जवळच्याच एखाद्या सायबर कॅफेमध्ये मेगाबायटी खरडी टाकून) गेले आहेत ही कल्पना केली.
काव्यरस

आमची पहिली परदेशवारी..........................

लेखक विलासराव यांनी मंगळवार, 27/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
असाच अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेमबर २००९ मधे... मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य झालोय......चुकभुल पदरात घ्यावी. माफी असावी .....फोटो कसे टाकावे ते कुणीतरी मार्गदर्शन करावे. पेन ड्राईव मधे फोटो आहेत.

'मिपा' च्या नवीन रुपड्या बद्द्ल अभिनंदन!

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 26/07/2010 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावाचं हे नवीन रंगरंगोटी केलेलं रुप अत्यंत प्रसन्न आणि मनोवेधक आहे. त्यानिमित्त व्यवस्थापनाचं मनःपूर्वक अभिनंदन...

पाध्यांचे मनोगत

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते. परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.
काव्यरस

प्रकटन

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे.

स्वप्नी माझ्या आलीस तू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/07/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी माझ्या आलीस तू
स्वप्नी माझ्या आलीस तू हळूच हसून लाजलीस तू कितीक दिसांनी झोप आली मला जागेपणी विसरलो जगाला न दिसे दुसरे काही दिसशी मजला तू रात्र माझी धुंदीत आली वेड्या मनाला समाजावून गेली स्वप्नाच्या वाटेने जातांना वाटेत भेटलीस तू होईल माझे स्वप्न का खरे भेटून सगळे सांग मला बरे विसरू नको आता काही प्रितीचे शब्द बोल तू - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/०७/२०१०
काव्यरस

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/07/2010 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे. आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे. कळावे. -संपादक मंडळ हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत.