Skip to main content

हे ठिकाण

वर्धापन दिनानिमित्त मिपाला शुभेच्छा!

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 11/09/2010 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज गणेशचतुर्थी. मिपाचा वर्धापन दिन. मिपावर मला येऊन एक वर्ष देखील झालं नाही. मिपाचा, किंवा एकंदरीत मराठी संस्थळांचा शोध लागला तेव्हा माझी वैयक्तिक स्थिती अतिशय वाईट होती. अजूनही ती पूर्णपणे सुधारली नाही, पण मिपामधून मला जो आधार मिळाला, मनात साचून राहिलेलं खूपसं लिहायला मिळालं, वाचायला मिळालं त्यामुळे ती सुसह्य झाली. आपल्या विशाल कुटुंबात मिपाने मला मोकळ्या हातांनी सामील करून घेतलं. माझं लेखन वाचलं, बरेवाईट प्रतिसाद दिले. नवीन लिहायला स्फूर्ती दिली. समधर्मी लोकांशी, मराठी भाषिकांशी सुसंवाद (कधी कधी नुसताच वाद) साधण्याची संधी दिली. त्याही पलिकडे जाऊन अनेक नाती जोडली गेली.

मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणे.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 31/08/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
दर्जेदार लेखन म्हणजे काय? हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो.

राग..............

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 31/08/2010 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
मला जेव्हा स्वतः चाच राग येतो....................... gussa" alt="" />

पुनरागमन..

लेखक प्राजु यांनी रविवार, 29/08/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मायबाप मिपाकर, नमस्कार!! अखेर.. यक्षनगरीत परतले आहे. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ ऑगस्टला मी अमेरिकेत परत आले आहे. काही परिहार्य कारणांमुळे, ३० जुलै ऐवजी २७ ऑगस्टला यावं लागलं. "गंध हलके हलके..!!" प्रकाशीत झाला. प्रकाशन सोहळ्याला खूपशा माझ्या आंतरजालीय मित्र मैत्रीणींनी उपस्थिती लावली होती. माझं मन खूप भरून आलं. इतके दिवस आंतरजालावर राहून काहीतरी नक्कीच मिळवलं याचं समाधान झालं. प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत बिपिनदाने लिहिलेला वाचला मी. पण तेव्हा वेळेआभावी सविस्तर प्रतिसाद देऊ शकले नाही. धन्यवाद बिपिनदा!! आता, आता पुन्हा नव्याने मिपाकरांच्या सेवेत रूजू होते आहे...

श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 27/08/2010 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!! मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink.

महा विडंबन स्पर्धा

लेखक आमोद शिंदे यांनी शनिवार, 21/08/2010 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन. तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

एक मत

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 18/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

माळशेज घाटात

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 14/08/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारी पुण्याहून सकाळी निघालो. पाउस नव्हताच. आळेफाट्याला पोहोचलो. तिथून डावीकडे वळून ओतूर गाठले. हवा हळूहळू कुंद बनत होती. सगळीकडे हिरवेगार दृश्य होते. आतापर्यंत दिसत असलेल्या टेकड्यांची जागा आता सह्याद्रीचे महाकाय पर्वत घेत होते. बहुतेक सर्वच हिरवा शालू पांघरून चेहर्‍यावर ढगांचा घुंघट ओढून बसले होते. मूळ राकट पुरुषी सौंदर्‍याचे आता हळूवार नाजूक स्त्रीत रूपंतर झाले होते. तितक्यात डावीकडे हडसर किल्याने दर्शन दिले.

आनंदी आयुष्याच्या पाककृती - 1 : मिपा कट्टा

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 12/08/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आनंद कसा घ्यायचा ते विसरले आहेत अशी तक्रार जागोजागी ऐकू येते. समृद्धीचे चणे वाढले असले, तरी दात ते चणे खाण्याऐवजी एकमेकांना विचकून दाखवणे, कोणावर तरी धरणे, कराकरा खाणे, स्वत:चाच ओठ चावणे, वगैरे गोष्टींमध्येच गढून जाताना दिसतात. 'थांबा आणि गुलाबांचा वास घ्या' या उक्तीप्रमाणे वागायची इच्छा असली तरी कधी कधी नुसते दुर्गंधीचे भप्कारेच येतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यात सध्या आयटीने जी क्रांती केलेली आहे, तीमुळे इतकी वर्षं मुकाट्याने काम करणाऱ्या बायकाही आता मारे हपिसात जाऊन चकाट्या पिटून संध्याकाळी नवऱ्याप्रमाणेच थकून भागून आल्याचं सांगतात.