पाध्यांचे मनोगत
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते.
परंतु दुसर्या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे. ते धागे उडाले नसल्याने हा ही उडणार नाही अशी अपेक्षा आहे.
अजून एक: कविता या लेखनप्रकारात माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे यातल्या व्हेटरन्सनी सांभाळून घ्यावे ही विनंती. :)
कोणती युक्ती अता मी वापरू |
लोकशाही फार लागे वावरू ||
जाहले निर्माण नव येथे जरी |
आणि वाढे आमुची संख्या जरी ||
मूळ कारण लोकशाही, ती सरेना |
दीन, पदभ्रष्ट तिज कैसे करू ||
जाब हे कंटक अम्हा पुसती कसे |
काय मी येथे तयाला उत्तरू ||
"तो न मी" हे पालुपद मी सांगतो |
घाम फ़ुटतो पाहता त्या रूबरू ||
माझिया सत्तेस काही धार नाही |
सर्व शक्ती मालकाची "क्या करूं?" ||
क्रमश: - ?
डिस्क्लेमरः
१.(सहज यांच्या प्रतिसादावरून) = वरील वर्णन प्रत्येक पाध्यांना लागू नाही. किंवा सगळे पाध्ये असाच विचार करतात असे नाही.
२. काही पाध्यांशी झालेल्या संपर्कात "नेहमी सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत" असा सूर होता. त्यामुळे समोर दिसणार्या गोष्टींतून सदस्यांचे काय समज होऊ शकतात याचे उदाहरण म्हणूनही ही कविता पाहता येईल.
नितिन थत्ते
वाचने
8924
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
माझिया
चला !
In reply to चला ! by अवलिया
णाणा वारी ला गेला होता कि काय?
छान
हं
In reply to हं by सहज
हं...
In reply to हं... by श्रावण मोडक
+२
आमचे
थत्ते
मस्त
In reply to मस्त by क्रेमर
+१
थत्ते
हा हा हा..
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
+१
हॅहॅहॅहॅ
वा, विडंबन म्हणून छानच आहे!
In reply to वा, विडंबन म्हणून छानच आहे! by चतुरंग
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
अहो काय करणार?
In reply to अहो काय करणार? by चतुरंग
भरलेले की
In reply to भरलेले की by अवलिया
ते ज्याचीत्याची जाण समज .....
In reply to अहो काय करणार? by चतुरंग
खरंय
सगळे मिळुन बदल घडवु
In reply to सगळे मिळुन बदल घडवु by रामदास
+१
मस्त