Skip to main content

'मिपा' च्या नवीन रुपड्या बद्द्ल अभिनंदन!

Published on सोमवार, 26/07/2010
मिसळपावाचं हे नवीन रंगरंगोटी केलेलं रुप अत्यंत प्रसन्न आणि मनोवेधक आहे. त्यानिमित्त व्यवस्थापनाचं मनःपूर्वक अभिनंदन...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2977
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

+२ खुप खुप अभिनंदन आणी शुभेच्छा!!!! पण मिसळपावचं चित्र ठेवायला हवं होतं असं मनोमन वाटतय. :) आपला, मराठमोळा

मिपाच नविनरुप सुंदर आहे. पण मिपाचं लोगो मिसळ्पावचे चित्र असायला हव.ते चित्र नाही बघितल की मिपावर आलोच नाही अस वाटतय. धनंजय बोरगांवकर

In reply to by Dhananjay Borgaonkar

सहमत. नविन रुप छानच आहे. परंतु मिसळपावच्या चित्राशिवाय मिपा म्हणजे काही तरी चुकल्या सारखं वाटतयं [सारखं वाटतयं की आपण चुकुन दुसर्‍याच्या घरात तर नाही ना आलो :) ]

In reply to by युयुत्सु

ते आताही सहजच दिसतेय ना... तुम्ही उजव्या हाताच्या साइडबार मधे "नवे लेखन" नावाचा दुवा पाहिलात का????

नवीन रुपडे एकुण खुपच तजेलदार आहे. खुप कष्ट घेउन बनवले आहे हे नक्की. मिसळीचे चित्र मात्र हवेच. त्याशिवाय मजा नाही. पुर्वी कलादालन मुखपृष्ठावरच दिसायचे. आता त्यासाठी फक्त वरती एक दुवा येतो. अजुन एक अपडेट कलादालन साठी सुरु केले तर बरे होइल.

हे नवीन रंगरंगोटी केलेलं रुप अत्यंत प्रसन्न आणि मनोवेधक आहे. - सहमत. ह्या नवीन रुपाच्या निमित्ताने मिपाचे अभिनंदन आणि मिपाला अनेकानेक शुभेच्छा.

मिपावर मिसळीच चित्रंनाही त्यामुळे चुक चुकल्या सारख वाटतय. अन्य सुविधा अजुन पाहिल्या नाहीय पण हे नवरुपड अंगवळणी पडायला थोडा वेळ द्यावा लागेलस वाटतय. डावी कडे असणर्‍या सगळे दुवे उजवी कडे आले असले तरी माऊस अजुन डावी कडेच झेपावतोय :) मिपाच्या आगामी वाढीस भरगोस शुभेच्छा! स्मायली गायवलेल्या दिसतायत :)

संपादक मंडळाने नवीन रुपड्यांबद्दल येत असलेल्या विविध सुचनांचा विचार करू असे आश्वासन अन्य ठिकाणी दिलेले आहेच, त्यामुळे अपेक्षीत असे अनेक सुंदर रूप मिसळपावला येईल हे नक्कीच. वैयक्तीकरित्या मला सर्वात आवडलेली सुविधा म्हणजे "बॅक टू टॉप". अपस्क्रोलिंगची कटकट कायमची गेली.

आता सगळिकडे जास्त चोउकोन दिस्तायत हेडिन्ग्सचि वगेरे.असे का? कि माझ्या पिसिमधे प्रोब्लेम आहे म्हणुन असे दिस्तेय?

नवे रुप छान आहे. पण तो मिसळपावचा फोटू हवा होता. आणि स्माईली टाकायची सुविधा द्या ना.

नवं रूप छानच आहे,पण मिसळपावचं चित्र आणि स्माइली यांच्याशिवाय मिपा सुनंसुनं वाटतं!