लेखकअवलियायांनी बुधवार, 30/06/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड.
वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती
हाव पाध्यांची उफाळलेली होती
नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगाडाची चाळवलेली होती
प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती
तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती
प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती
मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती
नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती
जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती
* असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.
लेखकसहजयांनी बुधवार, 30/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती
हाव पारध्याची उफाळलेली होती
नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगार्याची चाळवलेली होती
गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती
तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती
पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती
बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
लेखकआनंद घारेयांनी शनिवार, 19/06/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना मला अचानक कधीतरी लेखन करायची उबळ यायची. त्या वेळेला एकादा कोरा कागद हाताला लागला आणि कोणतेही विघ्न आले नाही तर तो पेन्सिलीने अथवा शाईने काळानिळा होत असे. ही लेखनाची ऊर्मी थोड्या वेळानंतर ओसरायची. पण आपल्याकडे इतरांचे किती लक्ष आहे हे पाहणे हा स्वभावातला स्थायी भाव होता. त्याचाच एक भाग म्हणून आपले लिखाण किती लोकांनी वाचले याबद्दल उत्सुकता वाटायची. पण भिडस्तपणा हाही मनातला दुसरा एक स्थायी भाव असल्यामुळे मी आपणहून त्याबद्दल कोणाला विचारत नसे.
दुसरे बालपण सुरू झाल्यानंतर पहिल्या बाल्यावस्थेतल्या कांही गुणांनीही डोके वर काढणे सुरू केले.
लेखकसहजयांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
लेखकहैयो हैयैयोयांनी शुक्रवार, 11/06/2010 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया
मित्रहो,
चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत.
आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या.
धन्यवाद.
हैयो हैयैयो.