Skip to main content

मनाचिया अंगणात.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 18/05/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाचिया अंगणात मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत ! गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत ! संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ? -----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------ आम्हांस इथे ही भेटा..... कलास्वाद : http://uday-saprem.blogspot

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

लेखक कैलासराजा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

किंमत

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 04/05/2008 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला प्रश्न हा साधाच होता पण तरी लागली ती कारणे शोधायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हो मला म्हटलेस तू कविते जसे मी खुळ्यागत लागलो वागायला भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला

मेळा

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/04/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नात थोर त्यांच्या बोलाविले मलाही शिंपून अत्तरांना, ते भेटले मलाही हासून फक्त तेथे मीही बसून होतो खोटे रमून जाणे, ते जमले मलाही एकेक माणसाला मी न्याहळीत होतो कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही देती यथेच्च सारे उंचीच भेटि सार्‍या सजवून भासते का ठेवले मलाही भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही लोटून अन्न सारे फेकून तेहि देता व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही! येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?" चतुरंग

(रस्ता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 29/04/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;) चावल्यावर जे मुखी मी घोळले तेच फिरता पाठ मागे थुंकले पिंकलो न येथे एकटा मी कधी सोबतीला हे जथे पण पिंकले तू कशाला चुना निघताना दिला तोंड रे माझे अशाने पोळले मुखरसां, मी काय रे आता करू? कोपरे सगळे जिन्याचे रंगले यार माझे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती थुंकण्या हे चालले हाय हा तांबूल मजला भावतो, त्या तमाकूविण कुणाचे भागले? तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी थुंकण्याचे सुख मलाही लाभले! हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी त्यास पिचकारुन आता रंगले! पचकला 'रंग्याच' जाल
Taxonomy upgrade extras

रस्ता

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी मंगळवार, 29/04/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
भेटल्यावर तोंडभर जे हासले तेच फिरता पाठ मागे बोलले मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले? मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! अनिरुद्ध अभ्यंकर

प्रारब्ध

लेखक पल्लवी यांनी सोमवार, 28/04/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
वेचले जे क्षण सुखाचे, ते मुळी नव्हतेच माझे पाहिले स्वप्नात माझ्या सौख्य ते नव्हतेच माझे ! आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे ! राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे ! एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ~पल्लवी~

मला मनाचे पटले नाही

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शनिवार, 26/04/2008 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे पटले नाही वाद आमचे मिटले नाही मला नेहमी ऐकू येते मनातही जे म्हटले नाही राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? अभिलाषेचे वादळ आले पाय काधी लटपटले नाही फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही अनिरुद्ध अभ्यंकर

(गजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 22/04/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

गझल

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 21/04/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा मुकीच होते आता मुकीच आहे आता मुकेपणाचा झाला सराव आहे जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे बोललेच नाही माझ्या व्यथा कुणाला सोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे आम्ही येथे भुकेले तेही तिथे उपाशी प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे गावात आम्ही हरलोच बाजी सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे
Taxonomy upgrade extras