मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

अनिरुद्ध अभ्यंकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे होती सताड उघडी गाभ्यात तावदाने गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने! आतून येत आहे आवाज हा कुणाचा? समजूत सांग त्याची काढू तरी कशाने?

वाचन 6531 प्रतिक्रिया 0