आवरताना काल मिळाल्या काही कविता...
लेखनविषय:
आवरताना काल मिळाल्या काही कविता
लिहिलेल्या मी सार्या होत्या तुझ्याच करता
लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर
जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता
तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी
आले नाही कधीच पण ते मज गोठवता
दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे
गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता
अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित
वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता
कधी एकटा असलो की मी रडून घेतो
सवयीने मग येते आता हुकुमी हसता
खूप ठरवले सारे सारे विसरायाचे
कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?
-अनिरुद्ध अभ्यंकर
वाचने
4954
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अप्रतिम ...
मस्त
अप्रतिम...
काल
सुरेख.
केशवराव,
In reply to केशवराव, by आजानुकर्ण
असेच म्हणतो
अप्रतिम कविता!
In reply to अप्रतिम कविता! by चतुरंग
(कालच
In reply to (कालच by विसोबा खेचर
हॅ हॅ हॅ
सुंदर
खासच..
सुरेख
आवरताना
अवांतर -
.............काही कविता
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by अनिरुद्ध अभ्यंकर
शबरी ???