नमस्कार मंडळी,
खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला..
खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे. ;) मी माझ्या गुरूंची त्याबद्दल आभारी आहे आणि त्यांची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वाढत राहुदे अशी त्या ईश्वराला प्रार्थना करते.
तर हीच सो कॉल्ड गझल...
माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही
या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही
होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही
असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही
जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही
सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही
- प्राजु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7273
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
या आधी ना
या आधी ना
छान...
अरे वा !
अरे वा प्राजू छान!
अभिनंदन.
असंख्य
साधे, सोपे
मस्त !!!
लै भारी!
अलामतीची सूट
In reply to लै भारी! by ऋषिकेश
बेसनलाडू, धन्यवाद.
In reply to अलामतीची सूट by बेसनलाडू
छान लिहिलंय!
गझल
सुंदर गझल
सुंदर गझल
धन्यवाद..
+१
In reply to धन्यवाद.. by प्राजु
फार छान
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी हेच मनात बसले...
In reply to छान by नंदन
सुरेख गझल
कोडे अजुन सुटले नाही..
मस्तच !!!
सुरेख
छान.
उत्तम भाव
छान
ही घ्या लिंक
In reply to छान by अजिंक्य
फार छान