(घजळ )
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :&
~X( ~X( ~X(
असे चोंदले, राहिला श्वास नाही
घसे शेकले, थांबला त्रास नाही
उरी कोंडला, पूर बेभान सारा
असो भेसुरा! कोरडा खास नाही
मला धाप लागे, उरी दाटल्याने
कुणा हाक देईन, आवाज नाही
किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा
मिळाली सर्दी साथ, आराम नाही
जसे होतसे प्राण नाकात गोळा
जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही
किती झीट झाले, तरी पार नाही
उतारे ठरे फोल ईलाज नाही
चेतन
अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
मिसळपाव
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक