आठवणी.....
सरी पावसाच्या नभी दाटलेल्या
ऊरी आठवांच्या लडी साठलेल्या !
तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही
सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या !
कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा,
तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या !
अवचित् कधी शेपटा त्या वेणीचा
जरा स्पर्शताही .....मुठी.. चाटलेल्या !
सखे राहिले ना वसंतास भान
बघुनी तुला त्या.....यौवनी घाटलेल्या !
अता एकदा हा मोगरा माळू दे ना
तुझ्या मोकळ्या केसांत्.....काटलेल्या !
करपून गेला बहर बघ कधीचा
अता कृष्ण म्लान .....गौळणी बाटलेल्या !
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1832
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
गझल आवडली . . .
पार्श्वभूमी.....
In reply to गझल आवडली . . . by दत्ता काळे
आत्ता लक्षात आलं.
In reply to पार्श्वभूमी..... by उदय सप्रे