मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी

अजिंक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जाणुनी, झुंजीत नाही शूर मी, दौडलो ऐसा कसा चौखूर मी ||१| काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी ||२|| ओघ हे मोठे नद्यांचे वाहती, गावच्या छोट्या नळाचा पूर मी ||३|| या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५||

वाचने 2241 वाचनखूण प्रतिक्रिया 11

मदनबाण 13/09/2009 - 18:29
या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| झकास... मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7529:2009-09-12-13-48-59&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

क्रान्ति 13/09/2009 - 21:59
इतकी जबरदस्त गझल वाचल्यावर काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी हे कुणाला पटेल? :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

प्राजु 15/09/2009 - 01:51
इतकी अप्रतिम गझल लिहिली आहे..!! मस्तच!! का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५|| हे खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अजिंक्य 15/09/2009 - 17:13
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. गझल शिकण्यासाठी मला प्रोत्साहित करणारे माझे वडील, त्याचप्रमाणे मिपावरील राघव, बेसनलाडू इ. सदस्यांचे मनःपूर्वक आभार. अजिंक्य.

अनिल हटेला 15/09/2009 - 20:59
आंदे और भी....:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)