मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजून

अजिंक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काळचक्र काळ ओढतो अजून, का मनुष्य व्यास मोजतो अजून ||१|| मात्र रात्र झोपण्या मिळे तयास, का उगाच स्वप्न पाहतो अजून ||२|| पाहतो जगात तो हिरे अनेक, कोळसे उगाच वेचतो अजून ||३|| लागते जमीन फक्त चार हात, वाटणीवरून भांडतो अजून ||४|| का स्वत:तला न सापडे प्रकाश, देवळात देव शोधतो अजून ||५||

वाचने 1111 वाचनखूण प्रतिक्रिया 1

३_१४ विक्षिप्त अदिती 18/09/2009 - 23:35
आवडली कविता. अदिती