मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंत.....

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत ! निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल? आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल..... या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न..... खंत..... आसवांचे केव्हढे उपकार झाले , मारेकरी कणवेस साक्षीदार झाले ! ( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !) जाधवांचे दु:ख जाणावे कसे? साथ ते सोडून .....दावेदार झाले ! ( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आणि हात जायबंदी असल्याने समोर बंदूक असूनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही हा आपल्याच त्या साथीदारांचा दावा असल्याची खंत आजही जाधवांच्या डोळ्यात जाणवते !) बघ पुन्हा झाले निखारे शांत आता , कालचे ते शेंबडे....."सरदार" झाले ! ( ज्या कारणासाठी असमर्थपणे राजीनामा द्यावा लागला , तेच आज परत त्याच पदावर आले ! लोक पण हे सारे विसरले , एकदा "शहीद" अशी पदवी दिली आणि हारतुरे घातले की आपले - माझे-तुमचे सार्‍यांचेच कर्तव्य संपले , इतकीच आमच्या निखार्‍यांची धग असावी ना?) चिलखते चोरीस केंव्हाचीच गेली , बार म्हणुनी फुसकेसुद्धा.....दमदार झाले ! (काही स्पष्टीकरण आवश्यक आहे का यावर?) अफझल्या बघ आपल्या गुर्मीत आहे रुतंबरा सारखे ...."गद्दार" झाले ! ( आमची माणसे मारून अफझल अजून जीवंत आहे आणि चिथावण्या दिल्या वगैरे आरोप ठेवून आमचीच माणसे साध्वी रुतंबरा सारख्या लोकांना जातीवादी आणि गद्दार ठरवले जाते आहे !) हाय ! झाकोळून गेले तेज अन..... चेहेरे पुन्हा, अळणी , कसे ?.....चवदार झाले ! ( जे शहीद झाले त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी काय गमावले ? चार पैसे फेकून सगळीकडे या मागे राहिलेल्या माणसांची जाहिरात करून आपलीच पाठ थोपटत सारे वर्तमान्पत्र वगैरे तथाकथित "मीडिया"वाले मात्र "थंडा"वले ! ) दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी , दंडवते घालवी जिथे कोट्यानुकोटी , ....स्मारकांचे बस् इथे हक्क्दार झाले ! (छत्रपती शिवाजी महाराजांनी तमाम रयतेसाठी , एका दीन माणसासाठी कधीही "राजा" असून ऐश्वर्याचा उपभोग घेतला नाही ! अश्या या "श्रीमंत योगी" महाराजांचे "स्मारक" बनवण्यासाठी कोट्यानोकोटी रुपये खर्च करणे ....हा एव्हढाच हक्क आता छत्रपतींचा एका साध्या रहाणीच्या भारतीय माणसावर राहिला हा केव्हढा दैवदुर्विलास !) उदय गंगाधर सप्रे-ठाणे

वाचने 1267 वाचनखूण प्रतिक्रिया 2

llपुण्याचे पेशवेll 01/12/2009 - 09:49
स्फुट छाण. असल्या गोष्टींचे काही वाटत नाही आता. "पडे काय गोळा घडे हत्याकांड | लाऊ एक पेग पाडू लेख छाण्छाण|| स्मृतीदिनी आणि मेणबत्त्या लावून| जय झेब्रा स्पिरीट नमूया महान|| " पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

हर्षद आनंदी 01/12/2009 - 10:07
पहिली गोष्ट : राजीनामा का दिला? झाल्या चुकांची जबाबदारी स्विकारुन १ वर्षात अमुलाग्र बदल करता आला असता, पण चुकांची जबाबदारी कोण घेणार, आणि मग खात्याचा खाण्यासाठी वापर कसा होणार? दुसरी गोष्ट : एवढी मोठी घटना घडुन निष्क्रीय राहणार्‍या काँग्रेसला निवडुन देताना जनतेची अक्कल कुठे शेण खात होती? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..