सजले अंतर
- Read more about सजले अंतर
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर
प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...
- कुमार जावडेकर