कुणाला कुणाचे कशाला हवे
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे
मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे
कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे
रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले
मढे माणसाचे कशाला हवे
.
प्रिया बांध रे बंध नाजूकसे
परी त्यात काचे कशाला हवे
.
मला दाखवी रूप माझे खरे
हसे आरशाचे कशाला हवे
.
धन्या फायद्याचे पहा नीटसे
लळे चाकराचे कशाला हवे
- - -
वाचने
4070
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्या हा श्लेष आवडला.
रचना फारच आवडली
उच्च!
चांगली
प्रकाटाआ
छान
गझल आवडली.
In reply to गझल आवडली. by विसुनाना
सहमत
गझल आवडली..
कविता, गझल वैग्रे प्रकार कळत
आम्हाला तुमचे -
दिल बहलाने के लिये
:-)
गजल खूप आवडली
कविता उत्तम आहे
मस्तच
आवडली कविता ..हल्ली मला असेच
मस्तच.
मला दाखवी रूप माझे खरे हसे
कविता आवडली. दुखवट्यामध्येही
छान कविता धनंजयसर.