मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३५

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भरलेली सभा! मान्यवर आसनस्थ होते. द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. "ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे." दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण!

सेक्रेड गेम्स २

किसन शिंदे ·
लेखनविषय:
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

युगांतर-आरंभ अंताचा भाग २७

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुर्दैव आणि शाप एकाच घराण्याला गिळंकृत करू पाहत होते. एकीकडे कुंती वनवास भोगत होती आणि दुसरीकडे तिचा चुलत भ्राता वासूदेव, कारावास ! माता पित्यांपासून दूर देवकीनंदन कृष्ण गोकुळात वाढत होता आणि त्याचा आत्मबंधु युधिष्ठिर आणि सोबत वायुपुत्र भीम राजमहालापासून दूर वनातल्या कुटीत. कुंतीने मंत्रशक्तीने इंद्राला पाचारण केले. काळंभोर ढगांची गर्दी झाली आणि शुभ्र विजेचा झोत येत तेजस्वी रुप समोर आले. "प्रणाम इंद्रदेव!" "कुंती, कश्या पुत्राची अपेक्षा आहे तुला?" "तो....जो मानव म्हणून उत्कृष्ट असेल.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युगांतर-आरंभ आंताचा! भाग २६ कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला. "बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर." "महाराज, एक प्रश्न आहे...." "राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं. "नाही महाराज... तुम्हाला." "मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत." कंसाला नशा चढली होती. "महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?" कंसाने त्याच्या कडे पाहिलं.

युगांतर आरंभ अंताचा भाग २५

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
देवकीने कंसाच्या पायाला जड बेड्यांनी सुजलेल्या हातांचा विळखा घातला. "भ्राताश्री.....हा सातवा पुत्र आहे, भ्राताश्री. सातवा आहे. आठवा नाही." कंसने चिडून पाय झटकला. रडणाऱ्या नवजात बालकाला घेऊन निघून गेला. 'गेलास? घेऊन गेलास शेवटचा उरलेला आशेचा किरण सुद्धा? "आमची सर्व आपत्ये तुझ्या हवाली करेन" असं म्हणत पतीचा जीव वाचवला...... तेव्हा कुठे माहित होतं? आपण निवडलेला पर्यायी मार्ग विषारी काट्यांचा असेल.... कुठे माहित होतं? त्या काट्यांचं विष जीव न घेता असं सतत रक्तात भिनत मृत्यूपेक्षाही भयंकर यातनादायी जीवन बनेल.... कुठे माहित होतं? कंस क्रूरतेच्या सर्व सीमा लांघून देईल....

युगांतर- आरंभ अंताचा भाग २४

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे." "अनुमती आहे." "महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी." 'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली. भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही!

युगांतर आरंभ अंताचा भाग २२

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"कुंती, माद्री, ऐकलंत का?" हातातली रवी तशीच सोडून कुंती बाहेर आली. "काय झालं आर्य?" शेतावरून मधेच परत आल्याने दोघींना काळजी वाटली. पंडुच्या नाजूक तब्येतीने त्याला काही होणार तर नाही ना ही सतत मनाला लागलेली भिती! त्यात किंदम ऋषींचा शाप.... कुंतीने माद्रीला सांगितले तेव्हा तिची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली होती. राजमहल सोडून कुटीत राहायला आली तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर कधी दु:खी भाव नव्हते. या शापाने मात्र तिला एकटे पाडले होते. गांधारीची सुंदरता आणि माद्रीचे लोभस रुप यात एक साम्य होतं..... लागलेलं ग्रहण! गांधारीच्या रुपाला अंधत्वाचं आणि माद्रीच्या रुपाला शापाचं!

युगांतर - आरंभ अंताचा भाग २१

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पंडु वनवासाला कंटाळून परतेल अशी अपेक्षा करत भीष्म आणि विदुर त्याची वाट पाहत होते. पंडुची नाजूक तब्येत वैद्यांच्या देखरेखीशिवाय कशी नीट राहिल, हा प्रश्नही त्यांना सतावत होता. दासाने दिलेल्या वार्ता ऐकून पंडु परतण्याची शक्यता आता धुसर झाली होती. शेती करत पंडु वनातच रमल्याचे चित्र ही घोर निराशा होती. 'हा सोन्याने मढलेला राजमहाल, दास-दासी, सोयी-सुविधा, मान-सन्मान, अधिकार..... सगळं निर्जीव आहे! आधीही असतील... पण आता त्यांच निर्जीव असणं जाणवतयं! काय बदललं हस्तिनापुरात इतकं देवव्रता की तुझं मन लागत नाही इथे? एका क्षणात हे सुख सोडून गेलेला पंडुपरिवार! खरचं वाटलं तुला, की तुझा शिष्य पंडु परत येईल?

युगांतर - आरंभ अंताचा भाग 20

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गर्द झाडी आणि हवेतला पहाटेचा आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. पंडू, कुंती आणि पंडूची द्वितीय पत्नी मद्रनरेशकन्या माद्री वनविहाराला आले होते. फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती. भुंगे गुंजारव करत होते. तितक्यात एक सुंदर हरिण उंच वाढलेल्या गवतातून पळताना पंडूला दिसले. आहाहा! काय ते रुप! सुवर्ण कांती! पंडूने धनुष्य हातात घेतले आणि हरिणामागे धावत गेला. कुंती आणि माद्री वनातल्या फुलांना बघत पक्षांची किलबिल ऐकत कितीतरी वेळ पंडूची वाट पाहत होत्या. सुर्यदेवांचे दर्शन घेत सुर्यफुले पिवळ्या धमक रंगात शोभून दिसत होती. वाऱ्यावर झुलत होती. दुपार होत आली आणि पंडू परत आला.

दिव्यांची कहाणी

शिव कन्या ·
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.