Skip to main content

धर्म

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 11/06/2020 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात आपण आत्मविचाराची साधना संहिता पाहणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: भगवान रमण महर्षी आत्मविचार साधनापद्धतीच्या पहिल्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना आपले सारे अवधान अंतर्यामी असलेल्या 'मी' या जाणीवेवर केंद्रित करण्याचा आणि शक्य तितका वेळ त्या जाणीवेला पकडून ठेवण्याचा सल्ला देत असत. ते पुढे असे सांगत असत की आत्मविचार करत असताना अन्य विचारांमुळे चित्त विचलीत होणे साहजिक असले, तरी आपले चित्त विचलीत झाले आहे हे लक्षात आल्यावर अवधान पुन्हा एकदा 'मी' या जाणीवेवर केंद्रित करणे आवश्यक आहे.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 11/06/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात 'आत्मविचार' या रमण महर्षींनी पुनरूज्जीवीत केलेल्या आणि पाश्चात्य देशातील साधकांना भुरळ पाडलेल्या साधनपद्धतीचा सैद्धांतिक अंगाने विचार केलेला आहे. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: रमण महर्षी ठामपणे असे प्रतिपादन करत असत, की देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. त्यांच्या काही उच्च कोटीच्या भक्तांना हे पटकन उमजत असे आणि सहजगत्या अवगत होत असे.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 10/06/2020 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरूपबोधविषयक या प्रकरणात आपण 'ज्ञानी' या संकल्पनेविषयीचे रमण महर्षींचा उपदेश जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी भगवद्गीतेच्या अध्यात २ मधे स्थितप्रज्ञ कसा ओळखावा? त्याचे/ तिचे व्यावहारिक जगातले वर्तन कसे असते? या अनुषंगाने अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे (भगवद्गीता श्लोक २.५४) सविस्तर उत्तर (भगवद्गीता २.५५ ते २.७२) तसेच भगवद्गीतेच्या अध्याय १२ मधे आलेले ज्ञानी भक्ताचे वर्णन (भगवद्गीता श्लोक १२.१३ ते १२.२०) वाचणे खचितच उपयुक्त ठरेल. हा संदर्भ सहज उपलब्ध असल्याने तसेच विस्तारभयास्तव तो इथे समाविष्ट केलेला नाही.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे. तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः 'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 28/03/2020 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 19/03/2020 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!