Skip to main content

धर्म

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 28/02/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

#नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/02/2020 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिन्यांनंतर मिपावर आले आहे... लेखन तर नाहीच पण वाचन देखील काही महिने जमलं नव्हतं. पण आता परत एकदा सगळंच सुरू करीन म्हणते. #नमामिगंगे... #काशीविश्वेश्वर आणि #वाराणासी दर्शन! वाराणासी म्हणजेच आपली काशी आणि येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिर! भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी #नमामिगंगे कार्यक्रमाआंतर्गत गंगा नदीला पूर्ववत निर्मळ आणि प्रदूषणरहीत करण्याचे ठरवले आणि यासाठी लगेच आर्थिक निधी उभारून हे काम २०१४मध्ये सुरू केले. अजूनही या कार्यक्रमाची पूर्तता झालेली नाही हे जरी सत्य असले तरी आजची #वाराणासी हे पूर्वीपेक्षा शतपटीने स्वच्छ शहर झालं आहे; असं सतत ऐकत होते.

हिंदू अंत्यसंस्कार

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 27/01/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश. अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो १ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत? २) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का?

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/01/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

स्वामीराया

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 20/12/2019 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान) दुसऱ्याचे असे मूठभर तरी नसे मान्य त्यासी काय म्हणावे या वृत्ती स्वामीराया आदिमाया आदिशक्ती हसतसे कैलासी पाहूनी मानवाची मति असे सर्व मायेची महती स्वामीराया कैसी प्रपंच्याची प्रगती कैसा प्रपंच्याचा नाश केवळ असे मायापाष त्याचे कैसे सुख- दु:ख स्वामीराया दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय स्वामीराया जैसे राजहंसाच्या वंशी क्षीर तितुके प्राशुनी उदक सांडूनिया देती आम्हा तैसेची वागवी स्वामीराया आध्यात्म असे गू

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

लेखक प्रास यांनी बुधवार, 18/12/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात. कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं. वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं. पं.

.

लेखक सुखी यांनी रविवार, 10/11/2019 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
वळ उजवीकडे अजून एकदा उजवीकडे अजून एकदा अजून एकदा अजून एकदा थोडा सरळ झालं मागे वळून बघ डावीकडे व उजवीकडे परत उजवीकडे वळून अजून एकदा एक छोटीशी गिरकी ये सरळ चालत अजून एक गिरकी हे डावीकडून मग उजवीकडून अजून एकदा उजवीकडून मग समोर बघ काय दिसतय झाली का सिद्धीमंत्राची पूर्वतयारी

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 06/11/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ -

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 01/11/2019 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 22/10/2019 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६