स्ट्रेस बस्टर
थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर.
खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही.
मिसळपाव