Skip to main content

धोरण

आपली बस

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

तुमचा पासवर्ड चेंज करा ....

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 24/04/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ... आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ... किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी.

सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)

लेखक मधु मलुष्टे यांनी मंगळवार, 01/04/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे. तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती.

आमचा निर्णय...

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 28/03/2008 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विडंबन करण्या मुळे मराठी साहित्याची होणारी हनी आणि आभिजात साहित्यिकांना व वाचकांना उठणारा पोटशूळ लक्षात घेता आज पासून आम्ही विडंबने प्रसिद्ध करणे थांबत आहोत..आज पर्यंत ज्या वाचकांनी प्रतिसाद/ दाद/ प्रेत्साहन दिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. केशवसुमार

विडंबनासंबंधी निवेदन

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 28/03/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. चतुरंग

मिपाचे धोरण..

लेखक सरपंच यांनी शनिवार, 22/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :) आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे. येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.

अभिनयक्षमता

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 22/02/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते.... विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

"कसं जगायचं , कसं वागायचं ? कुणी सांगेल का मला ?????

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 21/02/2008 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रशांत दामलेंच " एक मस्त गाणं आहे बघा "कसं जगायचं , कसं वागायचं ? कोणी सांगेल का मला ? " अशीच माझी अवस्था झाले आहे आज. का म्हणून काय विचारता ? सांगतो .......... काल मस्त सुट्टी घेतली आणि आज जरा फ्रेश मूड मध्ये कार्यालयात आलो . आल्यावर नेहमीच्या प्रघातासारखे काही महत्वाच्या व्यक्तींना "गूड मॉर्निंग घालून" झाल्यावर [ त्या बाबतीत आम्ही अगदी 'बापू काण्यांच्या' हातावर हात मारला आहे] आमचा 'मेलबॉक्स' ऊघडला. पाहतो तर काय एकूण ५२ 'अनरीड मेल्स ".

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा