उद्याचे आकाश -सीईटी साठी सराव परीक्षा प्रकल्प.
लेखनप्रकार
बरेच दिवस मी आणि विनायक प्रभू अनेक शैक्षणीक विषयांवर आणि एकूण स्पर्धात्मक परीक्षांबद्दल चर्चा करत होतो. काही दिवसानंतर चर्चेचा रोख हळूहळू शहरी आणि ग्रामीण या फरकाकडे वळला. आर्थीक परीस्थीती आणि व्यावसायीक कोर्सेसला ऍडमिशन याची पण चर्चा झाली .सीईटीच्या परीक्षेतील यश ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्याची पण चर्चा झाली.
सर्वसाधारणपणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील यशापयशाचे टप्पे ठरवतात.
दहावीला चांगले गुण मिळाले तर अकरावीला चांगल्या ज्युनीअरकॉलेज ला प्रवेश .
ग्रामीण भागात हा फरक नाही कारण मार्क चांगले किंवा वाईट कॉलेज जवळजवळ तेच असते.
आता, शहरात हा फरक आहे. चांगले गुण म्हणजे मान्यवर कॉलेज .उत्तम मार्गदर्शन .
आता गंमत पहा यामुळे बारावीला चांगले मार्क मिळाले तर खेड्यात काय आणि शहरात काय काहीच फरक नाही कारण व्यावसायीक कॉलेजच्या ऍडमिशन बारावीच्या मार्कांवार अवलंबून नाही. त्या ऍडमिशन ठरवणार बोर्डाची सीईटीची परीक्षा.
इथे मात्र शहर -गाव असा फरक लक्षात येण्याइतका जाणवतो.(लातूर अपवाद आहे).
गरीब आणि श्रीमंत असा फरक करीअरची दिशा बदलू शकतो.
फरक कसा पडतो हे वाचण्यापूर्वी सीईटी च्या परीक्षेबद्दल एक महत्वाचा मुद्दा.
महाराष्ट्र शासनाच्या बारावीच्या अभ्यासक्रमात सीईटीच्या परीक्षेची तयारी करून घेतली जात नाही.
मग होतं काय? बारावीला चांगलं पर्सेंटेज आणि सीईटीला मात्र केवीलवाणे रँकींग.
खाजगी वर्गांना याची जाणीव असल्यामुळे त्यांनी सीईटीच्या तयारीवर जोर देऊन बारावी आणि सीईटी असा संयुक्त अभ्यासक्रम बनवला.
जे काही चार पाच नामवंत वर्ग आहेत त्यांची फी भारी भक्कम आहे.
छोट्या गावांमध्ये ती फी देणारा पालक वर्ग नसल्यामुळे हे खाजगी वर्ग तिथे जात नाहीत.
या वर्गांची फी शहरात सुद्धा बर्याच जणांना परवडत नाही.
थोडक्यात भौगोलीक आणि आर्थीक फरक हे दोन्ही फॅक्टर सीईटीचे यशापयश ठरवू शकतात.
आता परत बारावीच्या अभ्यासक्रमाचा विचार केला तर तो अभ्यासक्रम सीईटीची तयारी करून घेत नसला तरी त्यातले नैपुण्य सीईटी ला उपयोगी पडू शकतं.
सीईटीची परीक्षा M.C.Q. पद्धतीची असते. यासाठी सराव करावा लागतो. सराव खाजगी वर्गात करून घेतला जातो आणि यशाचे प्रमाण वाढते.
सरावात एक गोष्ट नेहेमी दुर्लक्षीत केली जाते ती म्हणजे उत्तरपत्रीकेचे स्वरुप.
ही उत्तरपत्रीका O.C.R.असते.काही ठिकाणी याला ओएमाअर शीट म्हणतात. योग्य उत्तराची काळ्या ठिपक्याच्या स्वरुपात नोंदणी केली जाते.जवळजवळ सगळ्या वर्गात ही उत्तरपत्रीका दिसत नाही.सराव साध्या कागदावर करून घेतला जातो.अगदी साठ ते सत्तर हजार फी घेणार्या वर्गात पण अशी उत्तरपत्रीका वापरली जात नाही.
हा आहे या उत्तर पत्रीकेचा नमुना
परीणामतः दहा ते बारा मार्कांचे नुकसान त्या उत्तरपत्रीकेशी जुळवून घेण्यात जाते.वेळ आणि अचूकता यांची सांगड बरोबर घातली जात नाही आणि सीईटी चे मानांकन खाली घसरते.
या सराव परीक्षेवर सगळ्या विद्यार्थ्यांचे करीअर अवलंबून असते.शहरातल्या नामवंत वर्गांमध्ये ओसीआर ची व्यवस्था नसते. अगदी डमी ओसीआर ची सुद्धा नसते.
शहरात या सराव परीक्षेची किंमत साधारण आठ हजारापासून बारा हजारापर्यंत आहे.गावात तर ही सुविधापण उपलब्ध नसते.
आणखी थोडी माहीती या परीक्षेतील प्रश्नांबाबत.
मार्गदर्शक तत्वे माहीती असली तरी नेमके काय स्वरुपाचे प्रश्न येत असतीला या बाबतीत साशंकता कायम असते.ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांच्या बरोबर विचार विनीमय करून सराव परीक्षेचा रोख ठरवला जातो.सांगायचे ते असे की शहराबाहेरच्या विद्यार्थ्यांना सीईटी पार करणे फार कठीण जाते.जर बारावीची तयारी व्यवस्थीत केली असेल तर सराव परीक्षेची सांगड घालून मानांकन चांगले मिळण्याची शक्यता अनेक पटीनी वाढू शकते.
आता या बाबत आम्ही काय करणार आहोत याची माहीती .
या प्रकल्पाचे नाव - उद्याचे आकाश.
१
प्रभू सरांच्या अनुभवाचा आणि जन संपर्काचा फायदा घेऊन सराव परीक्षेचे एकूण आठ पेपर तयार केले जातील.
२
मुंबईच्या बाजूची गावे उदा: अंबरनाथ, शहापूर, पेण, मुरबाड, चिपळूण या गावातल्या ज्युनीअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल .
३
या परीक्षेचे गुणांकन आणि वातावरण सीईटीच्या परीक्षेचे असेल. (याला इंग्रजीत रीअल टाईम असे म्हणतात काय?)
४
परीक्षा ओसीआर सारख्या डमीवर घेतली जाईल.
५
दोन परीक्षांमध्ये एकदा प्रभू सरांचे समुपदेशन असेल.
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
७
या परीक्षा ना नफा ना तोटा या स्वरुपाच्या असतील. रामदास आणि प्रभू यांच्या सेवा विनामूल्य घेतल्या जातील.
८
या वर्षीचे लक्ष्य एक हजार विद्यार्थ्यांचे ठेवण्यात आले आहे.
आता खर्चाची बाबः प्रत्येक विद्यार्थ्यामागे सातशे पन्नास ते आठशे पन्नास.(काही विद्यार्थी फक्त सहा पेपरच देतील ).
बर्याच ठिकाणी बारावीला पालक हा खर्च करू शकत नाहीत.अशा परीक्षेत चांगले मानांकन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त संधी मिळावी आणि तळागाळापर्यंत लाभ मिळावा यासाठी या विद्यार्थ्यांचा ख्रर्च काही मिपा सदस्य उचलू शकतील का? याचा अंदाज घेण्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच मांडला आहे.
एका दात्यानी कमीतकमी पाच विद्यार्थ्यांचा खर्च करावा अशी अपेक्षा आहे.इच्छुकांनी सविस्तर माहीती व्यनीतून मागवावी.
या विद्यार्थ्यांचे ट्रेक रेकॉर्ड आणि मुख्याध्यापकांची शिफारस यावर भर देऊन त्यांना ही सवलत देण्याचा मानस आहे.पुरस्कृत केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापक पुरस्कर्त्यांना पाठवतील याची खातर्जमा केली जाईल.
हा लेख प्रकाशीत करण्यापूर्वी मिपाचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांची तोंडी परवानगी घेतली असली तरी मालक आणि संपादक मंडळ यांचा या आवाहनाशी व्यक्तीशा किवा एकत्र असा काही संबंध अथवा जबाबदारी नाही.
पूर्णपणे व्यक्तीगत जबाबदारी रामदास , प्रभू सर यांचीच राहील.
अधीक माहीती प्रतीसादातून येणार्या प्रश्न-उत्तरातून मिळेल.
वि.सू.- दहा अगर जास्त विद्यार्थी पूरस्कृत करणार्यांना आवश्यकता असल्यास आयकर सवलतीची व्यवस्था करून देण्यात येईल.

वाचने
8470
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
साहेब... या
लैच्च भारी
माझे मत
कार्यक्रम
आपल्याला
स्तुत्य
माझ्याशी
In reply to माझ्याशी by विसोबा खेचर
धन्यवाद
In reply to माझ्याशी by विसोबा खेचर
परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. ....
In reply to माझ्याशी by विसोबा खेचर
>> परंतु
In reply to >> परंतु by लिखाळ
माझ्याही कोरड्या शुभेच्छा!
In reply to >> परंतु by लिखाळ
प्रत्यक्ष
In reply to प्रत्यक्ष by विसोबा खेचर
तात्या, खुल
प्रभुसर मी
शेरातल्या
In reply to दीस का सारकं आसतान ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अवांतर
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे
In reply to शेरातल्या by ब्रिटिश
शाब्बास
परिक्षा प्रकल्पाला शुभेच्छा !!!
रामदास आणि विप्र खूपच चांगला उपक्रम आहे!
वा! मस्त प्रकल्प.. शुभेच्छा!..
In reply to वा! मस्त प्रकल्प.. शुभेच्छा!.. by ऋषिकेश
निरोप
उद्याचे आकाश
>>एका