मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्ट्रेस बस्टर

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर. खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही. पण ४ थ्या दिवशी पासुन मिळायला हरकत नाही. शास्त्रीय कारण नंतर सांगेन. जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.

वाचने 5230 वाचनखूण प्रतिक्रिया 21

टारझन 28/11/2008 - 16:25
जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो.
हे येता येता च कळलं होतं ... असो .. हा उपाय खात्रीशीर आहे. मजा येते - टारझन

अमोल केळकर 28/11/2008 - 16:28
धन्यवाद एकदम साधी सरळ युक्ती/ गोष्ट सांगितल्याबद्दल सध्या अतीशय आवश्यक गोष्ट आहे ही ! स्वगतः कंपनीत आत्ताच कॉस्ट कटिंग बद्दल मिटिंगला जाऊन आलो. (चिंतातुर ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुनील 28/11/2008 - 16:29
मास्तूर, ते आकडे १ ते १०० अशे सुलटे मोजले तर नाही का चालणार. उलटे मोजताना मध्येच गडबड होतेय! जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो. आता ही "इतर" टिकाणं कुठली ते पण सांगा की राव! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खादाड 28/11/2008 - 17:43
हे सिल्वा मेथड च्या पुस्तकात सान्गितल आहे ख्ररच काम करत!

विकेड बनी 28/11/2008 - 17:58
खुर्चीत सरळ बसा.
बसलो.
पाठीला पोक नको एवढच सरळ.
हो तेवढाच सरळ बसलो.
हात मांडीवर ठेवा.
ठेवले.
डोळे बंद करा.
केले. आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे.

In reply to by विकेड बनी

टारझन 28/11/2008 - 18:10
आ...ता पुढचे काही दिसत नाही. डोळे बंद करून टाइपता येते कारण सवय आहे. काय काय करायच्या सवई असतात लोकांना .. कमाल आहे ... डोळे बंद करून .. चालू द्या - टाऋषीमुणी

खादाड 28/11/2008 - 18:06
जोस सील्वा नावाचा एक लेखक आहे त्याच सील्वा माइन्ड कन्ट्रोल मेथड म्हणुन एक छान पुस्तक आहे !

लिखाळ 28/11/2008 - 21:19
चांगले आहे.. कधी थकून जाण्या येवढे काम केले तर हा उपाय करुन पाहीन :) >जाता जाता: ह्याचा इतर ठिकाणी पण उपयोग होतो. अरे वा.. तेव्ह हात कुणाच्या मांडीवर ठेवावेत ;) -- लिखाळ.

सूर्य 28/11/2008 - 21:20
हम्म.. बरे झाले तुम्ही ऑफीसचा ताण कमी कसा करायचा सांगितले ते. आज घरी गेल्यावर करुन बघितले पाहीजे. -सूर्य.